पियूष गोयल केंद्रीय अर्थमंत्री?

फेरबदलाच्या हालचाली, नव्या चेह-यांना मिळणार संधी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मागच्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू आहे. त्यातच २ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि बी. एल. संतोष यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. ३ तास चाललेल्या या बैठकीत सरकार आणि संघटनेतील नव्या चेह-यांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती समोर ठेवून हा फेरबदल असून, अनेक वरिष्ठ मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होऊ शकतो. दरम्यान, अर्थखाते महाराष्ट्राच्या नेत्याच्या हाती येण्याची शक्यता असून, यात पियूष गोयल यांचे नाव आघाडीवर आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार काही केंद्रीय मंत्र्यांना संघटनेत पाठवले जाऊ शकते तर संघटनेतील काही वरिष्ठ नेत्यांना सरकारमध्ये मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. सध्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे नाव अर्थमंत्रीपदासाठी आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या गोयल यांना अर्थव्यवस्थेचे चांगले ज्ञान आहे. गोयल हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

सीतारामन शिक्षणमंत्री?
सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे. त्या धर्मेंद्र प्रधान यांची जागा घेण्याची शक्यता आहे. अनुराग सिंह ठाकूर यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. त्यांना कॅबिनेट खाते मिळू शकते. तसेच आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे नावही मंत्रि­पदाच्या चर्चेत असल्याचे समोर आले आहे. पंजाबमधील तरुण चुग यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

मित्रपक्षांनाही लॉटरी?
मोदी मंत्रिमंडळात एनडीएतील मित्रपक्षांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी एखाद्याला मंत्रिपद मिळू शकते. जेडीयूप्रमुख नीतीश कुमार यांनीही केंद्रात आपल्या पक्षाला अधिक प्रतिनिधित्व मिळावे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांनाही संधी मिळू शकते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
36:07
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51
Video thumbnail
Latur|स्मार्ट वीज मीटरवरून मनसे आक्रमक; किल्लारीत जोरदार आंदोलन!
04:33
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:38:10
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; जेसीबीची धडक कारवाई
04:10
Video thumbnail
Latur| अखेर शेतकऱ्याला परत मिळाली बैलजोडी!
04:27
Video thumbnail
शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्फोटक पत्रकार परिषद लाईव्ह
08:29
Video thumbnail
लातूर-उदगीर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; कार, ऑटो आणि दुचाकीच्या धडकेत तिघे गंभीर जखमी
00:53
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00

Latest news