न्यूयॉर्क : जगभरातील युजर्सना मोठ्या प्रमाणातील आऊटेजचा फटका बसला. कारण, अनेक ठिकाणी फेसबुक डाऊन झाले होते वेबवरून लॉग इन करण्याचा प्रयत्न करणा-या फेसबुक युजर्सना खाते तात्पुरते उपलब्ध नाही असा मेसेज प्राप्त येत होता. मात्र, आता फेसबुकची सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
डाऊनडिटेक्टरवर आज (१९ जुलै) या सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी फेसबुकबाबत समस्या येत असल्याचे नोंदवणा-या युजर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली. सकाळी साधारण साडेआठ वाजल्यापासून ही समस्या निर्माण झाली होती. अनेकांनी फेसबुक डाऊनबाबत इतर सोशल मीडिया प्लाटफॉर्मवर तक्रारी केल्या होत्या. वेबसाइटबाबत मुख्य समस्या नोंदवली जात होती, तसेच अनेकांना प्लॅटफॉर्मवर लॉग इन करण्यातही अडचण येत होत्या. इतरांना फीड आणि टाइमलाइनमध्येही समस्या जाणवल्या. मोबाइल अॅप लोड होत असल्याचे दिसत असले तरी, तेही संथगतीने स्क्रोल असल्याची तक्रार युजर्सने केली.
















