37.7 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeनांदेडबारड येथे ट्रक ने उभ्या असलेल्या मोटारसायकल उडविल्या ; २ ठार

बारड येथे ट्रक ने उभ्या असलेल्या मोटारसायकल उडविल्या ; २ ठार

मौजे खरबी येथिल माजी उपरसपंच कोडेवाड यांचा मृत्यु

भोकर:(प्रतिनिधी) येथून नांदेडकडे निघालेल्या सिमेंट वाहतुकीच्या ट्रक क्र.एम एच ३४ बी जी ७४२३ ने बसस्थानकातुन बाहेर येत असलेल्या बसचा मार्ग मोकळा करण्यासाठी डावीकडे वळण घेतले त्यामुळे बारड बसस्थानका समोरील उभ्या असलेल्या १० मोटारसायकलला तसेच २ पादचा-यांना उडविले. त्यामध्ये ५ मोटारसायलचा चुराडा झाला असुन रुग्णालयांत डाँक्टरांनी दोघांस व्यक्तीस मयत घोषीत केले असुन ईतर गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे.तसेच गंभीर जखमींपैकी आणखी मयत वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

भोकर पासून २५ किमी अंतरावर नांदेड माहामार्गावर भोकर कडून नांदेड कडे जाणार्Þया सिमेंट वाहतुकच्या ट्रक क्र एम एच ३४ बी जी ७४२३ ने बसस्थानकातुन येत असलेल्या बसला मार्ग मोकळा करुन देण्यासाठी डावीकडे कल घेतला आणि बारड बसस्थानका समोर पानपट्टी किराणा समोर रस्त्यालगत उभ्या केलेल्या अंदाजे १० मोटारसायकल ला उडविले.त्

यामध्ये ५ मोटारसायकलचा चुराडा झाला आणि ट्रक नालीच्याकडेला अडकून बसला या घटनेमध्ये मौजे खरबी येथील माजी उपसरपंच गोंिवदराव रामजी कोडेवाड वय ५५ वर्षे यांचा तसेच दुसर्Þया एकाचाड दुख:द मृत्यु झाला असुन ईतर अंदाजे ८ गंभीर असल्याचे रुग्णालयाकडुन सांगण्यात आले आहे.गंभीर जखमींपैकी आणखी मयत वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.यावेळी माहामार्ग पोलिस कर्मचार्Þयांनी तात्काळ घटनास्थळी पोहचुन रस्त्यावर पडलेली वाहने बाजूला करुन तात्काळ जखमींना रुग्णालयांत पोहचविण्याचे कार्य केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR