‘मांजरा’च्या पाण्याची पिकांना संजीवनी

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात मार्च पासून उन्हाच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवत आहेत. मे महिण्याच्या अखेरीस सुर्याच्या आगीने बागायती पिकांची होरपळ सुरू झाली होती. मांजरा (धनेगाव) प्रकल्पातून तीस-या  उन्हाळी हंगामाद्वारे उजव्या व डाव्या  कालव्यात १५ मे पासून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिकांना संजीवनी मिळाली आहे.
लातूर जिल्हयात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतकरी बागायती क्षेत्राकडे मोठया प्रमाणात वळाले आहेत. शेतक-यांनी उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतानुसार ऊस, भुईमुग, भाजीपाला, पशुधनासाठी हिरवा चारा, मका, फळ पिकांची लागवड कली आहे.  या पिकांना शेतक-यांनी मार्च-एप्रिल पर्यंत उपलब्ध स्त्रोतांच्याद्वारे पिकांच्या वाढीसाठी पाणी दिले. मार्च पासून सुरू झालेल्या उन्हाळा मे महिण्यात अधिक स्वरूपात जाणवू लागला. जिल्हयात तापमाणाचा पाराही ४३ अंश सेल्सीअस पर्यंत पोहचल्याने बागायती पिकांचीही होरपळ सुरू झाली असून  दुपारच्या सुमारास पिके पांढरी दिसू लागली आहेत.
मांजरा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्याद्वारे ११ ते ३० मार्च पाण्याचे पहिले अवर्तन, १२ एप्रिल ते १ मे दुसरे अवर्तनाचे पाणी सोडण्यात आले होते. तर १५ मे पासून तीसरे उन्हाळी हंगाम पाणी आवर्तन सुरू करण्यात आले असून ५ जून पर्यंत ते सुरू राहणार आहे.
या पाण्याचा सुमारे ३ हजार हेक्टरवरील पिकांना लाभ होत असून यात ८० टक्के पिक हे ऊसाचे आहे. शेतक-यांही उन्हाळी हंगामात या पाण्याची वाट पाहतात. या पाण्यावरच बागायती पिकांची मोठया प्रमाणात मदार  आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
डिझेल टंचाईमुळे जिंतूर तालुक्यात शेतकरी हैराण; बोरी येथील पेट्रोल पंपावर मुक्काम ठोकण्याची वेळ
02:45
Video thumbnail
बिलोली उपजिल्हा रुग्णालयात संतापजनक प्रकार! गॅस संपल्याच्या बहाण्याने किचन बंद; रुग्ण उपाशी ?
04:25
Video thumbnail
राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा वाघ हल्ला; सिंदेवाही जंगलात ४ महिलांचा जागीच मृत्यू
00:30
Video thumbnail
५ जूननंतर नांदेड शहरात रस्त्यांची कामे होणार नाहीत; मान्सूनपूर्व बैठकीत मनपा आयुक्त यांचे संकेत
02:33
Video thumbnail
मध्यरात्री काळजाचा ठोका चुकला! माहूरच्या बाबा सोनापीर दर्गा परिसरात बिबट्याचे दर्शन
01:48
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|लातुरातील दयानंद महाविद्यालयाच्या परिसरातील नामांकित डॉक्टरची CBI कडून चौकशी सुरू
02:22
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|लातूरमधील औसा रोड परिसरातील नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर?
01:52
Video thumbnail
Latur|खंडापूर पादुका दर्शन अपहार प्रकरण; किशोर महाराजांच्या प्रतिमेला जोड्याचा हार, धरणे आंदोलन सुरु
04:10
Video thumbnail
शिव ठाकरेच्या अमरावतीतील घरी फराह खान यांची सरप्राईज भेट; शिवच्या आजीच्या हातच्या भाकरीवर मारला ताव
00:31
Video thumbnail
लातूरमध्ये खुराणा ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप!
00:35
Video thumbnail
लातूर पॅटर्नचे यश, आव्हाने आणि भविष्य; पहा काय म्हणाले डॉ.सोमनाथ रोडे!
24:00
Video thumbnail
हिंगोलीत डिझेल टंचाईचे संकट! शेतीच्या कामासाठी पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या किलोमीटर लांब रांगा
03:11
Video thumbnail
NEET पेपर फुटी प्रकरण: डॉ. मनोज शिरुरेंच्या पत्नीची CBI कडून कसून चौकशी; धक्कादायक माहिती समोर
03:11
Video thumbnail
उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
09:33
Video thumbnail
लातुरात डॉ. मनोज शिरुरेंच्या नातेवाईकांवर CBI चा छापा; दोन तास चौकशी, मोठी रोकड जप्त!
03:00

Latest news