34.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeलातूरलातूर जिल्ह्यात पावणे चारशे गावांत पाणीटंचाई

लातूर जिल्ह्यात पावणे चारशे गावांत पाणीटंचाई

लातूर : गेल्या पंधरा दिवसांपासून सतत हवामानात बदल होत आहे. अधुनमधून वादळी वा-यासह बेमोसमी पाऊसही पडत आहे. मात्र उन्हामुळे होरपळ वाढलेलीच आहे. परिणामी जलसाठे तळाला गेले आहेत. सध्या जिल्ह्यातील ३७६ गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने ती दुर करण्यासाठी ५२८ प्रस्ताव दाखल केले आहेत.  यंदा एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढली आहे. त्यामुळे चैत्र महिन्यातच तापमानाचा पारा ४० अंशसेल्सिअसवर पोचला आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. जलसाठे तळ गाठत आहेत,. परिणामी पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे अधिग्रहणाची मागणी आहे.
जिल्ह्यातील काही भागांत अधिक पाणीटंचाई निमार्ण झाली आहे. गावच्या एक किमीच्या परिसरात पााणी उपलब्ध नसल्याने टॅकरद्वारे पाणीपुरवठयाची मागणी २५ गावे आणि ६ वाड्या, अशा ३१ गावांनी ३७ प्रस्तावातून केली आहे. त्यापैकी १६ गावांचे १८ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. त्यातील ११ गावांसाठी १० टॅकर मंजूर करण्यात आले आहेत.  टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. औसा तालुक्यात पाणीटंचाईची दाहकता अधिक आहे. लामजना, खरोसा, मोगरगा, टाका, तांबरवाडी, राजेवाडी, कार्ला, शिवणी या गावांना टँकर मंजूर करण्यात आले आहे. तसेच अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी, जळकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा, वाघमारी तांड्यास टँकर मंजूर करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील एकुण ३७६ गावे व वाड्यांना पाणी टंचाई निवासरणासाठी ५२८ प्रस्ताव दाखल केले आहेत. पंचायत समितीने पाहणीअंती २२ गावांचे ४९ प्रस्ताव वगळले आहेत. २९२ गावांचे ३७१ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर केले आहेत. त्यापैकी १४७ गावे आणि ३९ वाड्या, अशा एकुण १७८ गावांना ९१४ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रस्ताव दाखल केलेल्या गावांना मंजूरीची प्रतिक्षा आ.हे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR