माणसाची भीती ओळखून भटके कुत्रे हल्ला करतात! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

नवी दिल्­ली : वृत्तसंस्था
देशातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या सुळसुळाटावर आणि त्यांच्यामुळे होणा-या त्रासावर सर्वोच्­च न्­यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संजय मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. कुत्रे माणसांमधील भीती ओळखू शकतात आणि त्याच भीतीमुळे ते हल्ला करतात किंवा चावा घेतात असे निरीक्षण आज सर्वोच्­च न्­यायालयाचे न्यायमूर्ती नाथ यांनी नोंदवले.

आज सलग दुस-या दिवशी अडीच तास सुनावणी पार पडली. यानंतर न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी स्­पष्­ट केले की, न्यायालय शुक्रवारी या प्रकरणाची पुन्­हा सुनावणी करेल. गेल्या ७ महिन्यांत सहा वेळा सुनावणी भटक्या कुत्र्यांच्या सुनावणी झाली आहे.

याचिकाकर्त्याच्या वकिलांनी आकडेवारी सादर करताना सांगितले की, राज्यांनी दिलेल्या माहितीनुसार नगरपालिकांकडून नेमके किती निवारे चालवले जातात, याची स्पष्टता नाही. संपूर्ण देशात केवळ ५ सरकारी निवारे असून, त्यातील प्रत्येकाची क्षमता १०० कुत्र्यांची आहे. भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची देशात मोठी कमतरता असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

प्राणी कल्याण संस्थेच्या वतीने बाजू मांडणारे वकील सी.यू. सिंह यांनी कुत्र्यांना त्यांच्या मूळ जागेवरून हटवण्यास किंवा निवा-यात पाठवण्यास विरोध दर्शवला. कुत्रे हटवले तर उंदरांची संख्या वाढेल, असा युक्तिवाद त्यांनी केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
04:10:56
Video thumbnail
Latur|उजनी जि.प. शाळेत सीजीपीची एन्ट्री! अभिजीत दिपके यांनी घेतला थेट आढावा
04:54
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
00:00
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59

Latest news