28.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeलातूरमुलांना मोबाईल, टीव्हीपासून दूर ठेवा : मोटेगावकर

मुलांना मोबाईल, टीव्हीपासून दूर ठेवा : मोटेगावकर

रेणापूर :  प्रतिनिधी
पालकांनी आमच्या संस्थेवर विश्वास दाखवून या शाळेत प्रवेश दिला. त्या विश्वासास तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही देत  पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल व टीव्ही पासून दुर ठेवावे आणि शाळेतून दिलेल्या अभ्यासाकडे लक्ष दिले आणि विद्यार्थ्यांनी मन लावुन अभ्यास केला तर  ठरविलेल्या ध्येयापर्यंत पोहचायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन आरसीसी चे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी व्यक्त केले.
रेणुका एज्युकेशन सोसायटीद्वारा संचिलत रेणुका पब्लिक स्कुल येथे स्रेहसंमेलन व   समाजातील उत्कृष्ट कार्य करणा-या व समाजाला सेवा देणा-या कर्तृत्वान व्यक्तींचा गौरव सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ मिलन मोटेगावकर या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन रघुनाथराव मोटेगावकर, तहसिलदार मंजुषा भगत व पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे, प्रा डॉ पांडूरंग मामडगे यांच्यासह सत्कार मुर्ती डॉ अनुराधा  कोतवाडे, सुमित्रा सुडे, रागिनी यादव , पत्रकार सिद्धार्थ चव्हाण, माधवराव चव्हाण, ज्ञानेश्वर जगदाळे हे उपस्थित होते. यावेळी तहसिलदार भगत  व पोलीस निरीक्षक अनंत्रे यांनी शुभेच्छा दिल्या तर प्रा .डॉ मामडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात संस्थेच्या अध्यक्षा मिलन मोटेगावकर म्हणाल्या की, शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे. मोटेगावकर यांनीही शिक्षणातूनच प्रगती केली आहे. प्रस्ताविक मुख्याध्यापक बाबासाहेब बरीदे यांनी केले. आभार प्राचार्य चिरलगे यांनी मानले .
रेणुकाई सन्मान पुरस्कार २०२४  दर वर्षी स्रेह संमेलन कार्यक्रमात तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान केला जातो. यावर्षी  वैद्यकीय क्षेत्रातून डॉ कोतवाड, शैक्षणिक क्षेत्रातून सुमित्रा सुडे , राजकीय – रागिनी यादव, पत्रकार सिद्धार्थ चव्हाण, कृषी क्षेत्र – माधवराव चव्हाण , सामाजिक क्षेत्रातून  ज्ञानेश्वर जगदाळे यांची निवड करून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR