40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेड‘शिवगर्जना’ महानाट्याला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘शिवगर्जना’ महानाट्याला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवगर्जना या महानाट्याचे नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर तिनं दिवस झालेल्या प्रयोगास जिल्हा प्रशासनाच्या आवाहना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नाट्यातील अनेक चित्तथरारक प्रसंगांनी प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवले.

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्य प्रयोगाचे सादरीकरण होत आहे. या महानाटयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना या महानाट्याचे तीन दिवस गुरुद्वारा मैदानावर भरगच्च प्रेक्षकांच्या उपस्थितीत सादरीकरण झाले. कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंग सादर केले. यात प्रामुख्याने श्री रायरेश्वर मंदिरात घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ, अफजलखानाचा वध, आग्र्यावरुन सुटका, पुरदंरचा तह, शाहिस्तेखानाची फजिती अशा अनेक घटनांवर आधारित प्रसंग हुबेहुब सादरीकरणामुळे प्रेक्षकांच्या समोर ऐतिहासिक क्षण डोळ्यापुढे जशाच तसे उभे राहीले.

छत्रपती शिवाजी महाराजाच्या उदयापूर्वीची महाराष्ट्राची परिस्थिती, परकिय आक्रमणात पोळलेला महाराष्ट्र आणि छत्रपतीचा उदय होतानाची परिस्थिती. त्याकाळातील संस्कृती, लोकनाट्य, लोककला याची गुंफण करीत पुढे छत्रपतीच्या आयुष्यातील चित्तथरारक प्रसंगाचे लक्षवेधी सादरीकरण, ओघवते निवेदन, ध्वनी व प्रकाश व्यवस्था यामुळे रसिकांना या महानाट्याने खिळवून ठेवले . छत्रपती शिवाजी महाराजांची थेट घोड्यावरून मावळ्यांसह मैदानावरली उपस्थीत प्रेक्षकांच्या गराड्याला मारलेली लाईव्ह रपेट, घोड्यावरची चार मजली सेटवरची हृदयाचा ठोका चुकवणारी एन्ट्री, युद्धाचे चित्तथरारक प्रसंग पाहतांना मोबाईल च्या बॅटरी प्रकाशाने उपस्थीत शिवप्रेमीनी दिलेला प्रतिसाद सर्वकाही सांगून गेला, सलग तीन तास कोणताही मध्यांतर न घेता ह्या नाट्यप्रयोगाने रसिकांना खिळवून ठेवले. शिवगर्जना महानाट्य आलेल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR