मुलाला उमेदवारी न मिळाल्याने गुलाबराव पाटील नाराज

जळगाव : प्रतिनिधी
विधान परिषदेची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने आपल्या मुलाला आमदार करण्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वप्न अधुरे राहिले असून, यावरून ते प्रचंड नाराज आहेत.

गुलाबराव पाटील म्हणाले, अनेक लोक म्हणतात की तुम्हाला विधान परिषदेसाठी तिकिट मिळाले नाही. मात्र मी एवढेच सांगतो, ‘नसीब में होगा तो उछलकर आयेगा और नसीब में नही होगा तो आकर चला जायेगा’ अशी शायरी त्यांनी म्हणून दाखवली. तसेच पुढे म्हणाले की, देवाच्या कृपेने यापेक्षाही पुढे आयुष्यात काही चांगले होणार असेल. त्यामुळे प्रारब्धावर विश्वास ठेवा. सगळं करा, राजकारण जरूर करा, पण भगवा प्रकाशातील विचार कधी सोडू नका. तुम्ही आमदार केले, मंत्री केले म्हणून मी सामाजिक कार्य करतो आहे. तुमची सेवा करू शकतो आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

आपल्या मुलाला विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मुंबईत ठाण मांडून एकनाथ शिंदे यांच्या अनेकदा भेटी घेत शर्थीचे प्रयत्न केले. मात्र भाजपने ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने त्यांच्या पदरी मोठी निराशा आली आहे. शिंदे गटातील या उघड नाराजीचा फटका आगामी निवडणुकीत महायुतीच्या भाजप उमेदवाराला बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, या अंतर्गत खदखदीचा थेट फायदा विरोधकांच्या पथ्यावर पडणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजप उमेदवाराचा अर्ज भरताना गैरहजर

आपले चिरंजीव प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही असलेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी, मुलाला तिकिट न मिळाल्याच्या नाराजीतून जळगावमधील भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेकडे थेट पाठ फिरवली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01
Video thumbnail
दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये भीषण दुर्घटना: ‘होटल फ्लोरिस स्टे’ला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू
01:29
Video thumbnail
'शेवटची उडी' ठरली काळ; पोहायला गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
01:38
Video thumbnail
सुरत-धुळे हायवेवर काळजाचा थरकाप: दोन एसटी बसची समोरासमोर धडक, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
01:37
Video thumbnail
Latur|नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर लातुरात राष्ट्र सेवा दलाची गोलमेज परिषद
07:09
Video thumbnail
Latur|शिवरायांच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा 5-6 जूनला; रायगड सज्ज
03:56
Video thumbnail
Latur|क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; पिक विम्यावरून प्रशासनाला अल्टिमेटम
06:56
Video thumbnail
Latur|लातूर शहरात अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर; फुटपाथ मोकळे करण्याची मोहीम वेगात
06:14
Video thumbnail
Nanded|शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मुदखेड तहसीलवर काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
03:21

Latest news