दुग्ध व्यवसायामुळे युवकांसाठी रोजगाराची नवी दारे खुली

लातूर : प्रतिनिधी
अनुभवी गोपालक, ख्यातनाम शास्त्रज्ञ आणि दूरदृष्टी असलेल्या धोरणकर्त्यांच्या संयुक्त योगदानातून देशातील दुग्ध उत्पादनात गुणात्मक व संख्यात्मक वाढ झाली आहे. स्वातंत्र्यौत्तर काळात प्रतिव्यक्ती दुधाची उपलब्धता ११० ग्रॅमवरून सुमारे ४०० ग्रॅमपर्यंत वाढली असून दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण युवकांसाठी उद्योजकतेचे नवे दालन खुले झाले आहे, असे प्रतिपादन कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.
जिव्हाळा ग्रुप उदगीरच्या वतिने जागतीक दुध दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथराव मुडपे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ. अनिल भिकाने, प्रा. डॉ. विजय भामरे आणि प्रा. डॉ. राजेश शेळके उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. भिकाने यांनी जागतिक दुग्ध दिनाचे महत्त्व विशद केले. भारतातील धवल क्रांतीच्या यशामध्ये महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात आणि कुटुंबांच्या आर्थिक सक्षमीकरणात महिलांनी मोलाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रा. डॉ. विजय भामरे व प्रा. डॉ. राजेश शेळके यांनी दुध हे संपूर्ण अन्न असून ते लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. तसेच एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी खरीप हंगामात कमी कालावधीत आणि कमी पावसात येणा-या पिकांचे उत्पादन घेण्याचे नियोजन करावे, असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. याप्रसंगी डॉ. अशोक दारनुळे, रमाकांत बनशेळकीकर, दशरथराव शिंदे, मोहनराव खिंडीवाले, लक्ष्मीकांत बिडवई, मनोहर कुलकर्णी, पांडूरंग बोडके, बाबुराव वाघमारे, अशोक हळळे, सोपानराव माने, चंद्रकांत रोडगे, शरणप्पा खेळगे, शंकरराव साबणे, अमृतराव देशपांडे, षणमुखानंद मठपती, हावगीराव आचारे, लहुदास याचावाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01
Video thumbnail
दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये भीषण दुर्घटना: ‘होटल फ्लोरिस स्टे’ला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू
01:29
Video thumbnail
'शेवटची उडी' ठरली काळ; पोहायला गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
01:38
Video thumbnail
सुरत-धुळे हायवेवर काळजाचा थरकाप: दोन एसटी बसची समोरासमोर धडक, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
01:37
Video thumbnail
Latur|नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर लातुरात राष्ट्र सेवा दलाची गोलमेज परिषद
07:09
Video thumbnail
Latur|शिवरायांच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा 5-6 जूनला; रायगड सज्ज
03:56
Video thumbnail
Latur|क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; पिक विम्यावरून प्रशासनाला अल्टिमेटम
06:56
Video thumbnail
Latur|लातूर शहरात अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर; फुटपाथ मोकळे करण्याची मोहीम वेगात
06:14
Video thumbnail
Nanded|शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मुदखेड तहसीलवर काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
03:21

Latest news