31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयमोदी तिस-यांदा पंतप्रधान होणार!

मोदी तिस-यांदा पंतप्रधान होणार!

नॉस्ट्रॅडॅमसची ५०० वर्षांपूर्वीची भविष्यवाणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ४ जूनला लोकसभा मतदानाचा निकाल लागणार असून देशाचा कौल कुणाला आहे, हे स्पष्ट होईल. देशात एकीकडे इंडिया आघाडी आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी एनडीए अशी निवडणूक पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणूक कोण जिंकणार, कुणाचे सरकार येणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, भारताबद्दलची एक भविष्यवाणी सध्या चर्चेचा विषय आहे. फ्रेंच भविष्यकार नॉस्ट्रॅडॅमस यांच्या भविष्यवाणीनुसार भारतात नरेंद्र मोदी हेच तिस-यांदा पंतप्रधान होणार, असा दावा केला जात आहे. फ्रेंच भविष्यकार नॉस्ट्रॅडॅमस यांनी ५०० वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

काही अहवालांवर आधारित मीडिया रिपोर्टनुसार नॉस्ट्रॅडॅमसने भारताबद्दल अनेक भाकितं केले आहेत. नॉस्ट्रॅडॅमसच्या एका भविष्यवाणीनुसार भारतात २०१४ पासून २० वर्षे हिंदू नेता राज्य करेल, असे भाकित केले आहे. २०१४ पासून भारतावर हिंदू राज्य येईल. हा नेता जगभरात मोठे नाव कमावेल, असाही उल्लेख असल्याचा दावा करण्यात येतो. नॉस्ट्रॅडॅमसच्या भाकितानुसार एकविसाव्या शतकात भारत महासत्ता म्हणून उदयास येईल. या भविष्यवाणीच्या आधारावर नॉस्ट्रॅडॅमसने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा अचूक अंदाज वर्तवल्याचा दावा केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR