रेणाकडून उसाला प्रती टन ३ हजारांचा पहिला हप्ता

रेणापूर/लातूर : प्रतिनिधी
राज्याच्या साखर उद्योगात नावलौकिक असलेला  रेणापूर तालुक्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम (२०२६-२७) ११ ऑक्टोबर २०२६ रोजी कारखान्याचे संस्थापक तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख व इतर मान्यवरांच्या हस्ते झाला. त्यानंतर  प्रत्यक्ष ऊस गाळपास सुरुवात करण्यात आली. दि. २ नोव्हेंबर २०२६ अखेर कारखान्याने एकूण ७१,०४५ मे. टन ऊसाचे गाळप केले असून त्यापोटी ऊस गाळप शेतक-यांना  दिवाळीपूर्वी ३ हजार मेट्रिक टनप्रमाणे पहिला हप्ता १८ कोटी ९५ लाख ८८ हजार रुपये शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. रेणा साखर सर्कलमध्ये ऊस उत्पादकांची दिवाळी गोड होणार आहे. दरम्यान दिवाळीपूर्वी रक्कम शेतक-यांना दिल्याने ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कारखान्याच्या २१ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी सहकारमहर्षी  दिलीपराव देशमुख यांनी हंगाम २०२६-२७ मध्ये कारखान्यास गाळपासाठी ऊस पुरवठा करणा-या ऊस उत्पादक शेतक-यांना पहिला हप्ता प्रति मे. टन ३,००० रुपये प्रमाणे देण्याचे जाहीर  केले होते. त्यानुसार त्यांच्या सूचनेप्रमाणे दि. ३१ ऑक्टोबर २०२६ अखेर कारखान्यास गाळपास आलेल्या ऊसाचे ऊस बिल दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित ऊस उत्पादक पुरवठादारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात  आले आहे सद्यस्थितीत आपल्या भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, शेतक-यांकडून कारखान्याकडे ऊस नोंद मोठ्या प्रमाणात झाली आहे मात्र, पाण्याअभावी ऊस उत्पादनात घट होत असून काही ठिकाणी ऊस पिकाचे नुकसान होत  आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतक-यांचे नुकसान टाळण्यासाठी कारखान्याचे दैनंदिन गाळप वाढवून नोंद झालेल्या सर्व ऊसाचे वेळेत गाळप करण्याचा मानस  संचालक मंडळाचा आहे. उसाचा हप्ता दिपावली पूर्व बँक खात्यावर पडल्याने शेतक-यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38
Video thumbnail
Latur Cyber Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 28 लाखांची फसवणूक; सहा आरोपी अटकेत
03:28
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
01:29
Video thumbnail
Manoj Jarange|500 कोटींच्या कथित आरोपांवरून शिंदे-फडणवीसांना जरांगेंनी घेरलं
12:51
Video thumbnail
Latur|गुंजन पाटील यांच्या हृदयस्पर्शी कवितांनी व्हिडीएफ बाजारचा समारोप.
10:05
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्हा न्यायालयाला बॉम्बची धमकी; न्यायालय परिसर रिकामा, बीडीडीएस तपासणी सुरू
01:35
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेखविरोधात पोक्सो अंतर्गत तिसरा गुन्हा दाखल; तपास एसआयटीकडे
02:43
Video thumbnail
Latur Traffic|लातूरच्या शिवाजी महाराज चौकात दीड तास वाहतूक ठप्प;शहरातील मुख्य रस्त्यावर कोंडी
02:24
Video thumbnail
Nanded|लोह्यात बजाज आणि श्रीराम फायनान्स कार्यालयांची तोडफोड; क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक
02:19
Video thumbnail
Latur|लातूरच्या अशोक हॉटेल चौकात झाड कोसळले; ऑटोचे नुकसान, जीवितहानी टळली
02:53
Video thumbnail
Nanded|उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते चंद्रकांत शिंदे कुटुंबाला ५ लाखांची मदत
00:41
Video thumbnail
Tuljapur|राणा जगदीशसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोनारवाडीत जनहिताचे उपक्रम
02:35

Latest news