लातूर लॉयन्स, चाकूर चाजर्स, उदगीर अनटाईड, जळकोट टायटन्सची विजयी घोडदौड

लातूर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहे. शुक्रवारी या स्पर्धेत लातूर लॉयन्स, चाकूर चाजर्स, उदगीर अनटाईड, जळकोट टायटन्स या संघांनी विजय मिळवत आपले स्थान अधिक बळकट केले आहे. शुक्रवारी रेणापूर रॉयल संघाने प्रथम फलंदाजी करताना १० षटकात चार गडी गमावून ११० धावा केल्या. यात रोहन रेड्डीने सर्वाधिक ३८ चेंडूत ८५ धावा केल्या. तर तसेच ११० धावांचा पाठलग करताना लातूर लॉयन्सच्या एमडी मोहम्मदने सर्वाधिक ४४ धावा केल्या. लातूर लॉयन्सच्या रोहण रेड्डी व बालाजी मुंडे यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना तंबूत धाडले. लातूर लॉयन्सने ७.४ षटकात ५ गडी गमाून १११ धावा करत विजय मिळवला.
तसेच चाकुर चार्जरसने देवणी डेअरडेव्हील संघास ११५ धावांचे उद्दिष्ट दिले होते. मात्र देवणी डेअरडेव्हील संघाने १० षटकात प्रयत्न करूनही १० गडी गमावून ९४ धावापर्र्यंतच मजल मारता आली. यात चाकुर चार्जरसचा २१ धावांनी विजय झाला. तसेच शिरुर अनंतपाळ स्ट्रायकरने उदगीर युनायटेड संघास १० षटकात ८० धावा काढण्याचे उद्दिष्ट दिले होते. उदगीर युनायटेड संघाने सदर उद्दिष्ट ९.५ षटकात ७ गडी गमावून ८२ धावा करत रोमाहर्षक विजय मिळवला. तर जळकोट टायटन्सच्या विरोधात ग्रामीण इंडियन्स संघाने १० षटकात ९ गडी गमावून ९४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात जळकोट टायटन्सने ६ गडी गमावत ८.२ षटकात ९८ धावा करत उद्दिष्ट पूर्ण करत दमदार विजय मिळवला
लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० क्रिकेट स्पर्धेची संकल्पना माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची आहे. ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंचे क्रीडा कौशल्य पाहूण क्रीडा प्रेमी भारावून जात आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53

Latest news