मुंबई : प्रतिनिधी
भारताने सलग दुस-यांदा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर संघातील अनेक खेळाडू चर्चेत आले आहेत. विशेषत: संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. सेमीफायनल आणि फायनलमध्ये छोटी पण धडाकेबाज खेळी करून संघाला विजयापर्यंत शिवमने पोहोचवले. शिवम दुबेने मुंबईत गेल्या वर्षीच कोट्यवधी रुपयांचे दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. जून २०२५ मध्ये मुंबईतील ओशिवरा परिसरामध्ये हे फ्लॅट घेतले आहेत. या दोन्ही फ्लॅटची एकत्रित किंमत तब्बल २७.५० कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे.
हे दोन्ही फ्लॅट ऊछऌ एल्लू’ं५ी या प्रोजेक्टमध्ये आहेत. हा प्रोजेक्ट देव लँड अँड हाऊसिंग लिमिटेड या कंपनीचा आहे. रजिस्ट्रेशनशी संबंधित कागदपत्रांनुसार, हे दोन्ही फ्लॅट एकाच इमारतीत आहेत. त्यापैकी एक फ्लॅट १७व्या मजल्यावर तर दुसरा १८व्या मजल्यावर आहे. या दोन्ही फ्लॅटचा आकार सुमारे ९६०० स्क्वेअर फूट आहे.
या व्यवहारासाठी दुबेने मोठी स्टॅम्प ड्युटीही भरली आहे. कागदपत्रांनुसार, या फ्लॅटच्या खरेदीसाठी त्याने जवळपास १.६५ कोटी रुपये केवळ स्टॅम्प ड्युटी भरली आहे. याशिवाय सोसायटीमध्ये तीन पार्किंग स्लॉटही त्याने खरेदी केले आहेत.
शिवम दुबेची कमाई प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून होते. त्याला प्रत्येक टी-२० सामन्यासाठी सुमारे ३ लाख रुपये मानधन मिळते. याशिवाय तो बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या ‘सी’ ग्रेडमध्ये आहे, ज्यामुळे त्याला वर्षाला १ कोटी रुपये मिळतात. २०२५ च्या लिलावापूर्वी चेन्नईने त्याला तब्बल १२ कोटी रुपयांना रिटेन केले होते. या मोठ्या करारानंतरच दुबेने मुंबईतील हे आलिशान फ्लॅट खरेदी केल्याचे सांगितले जाते.
अलीकडील टी-२० विश्वचषकात शिवम दुबेने महत्त्वाची भूमिका बजावली. सेमीफायनलमध्ये त्याने २५ चेंडूत ४३ धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर फायनलमध्ये केवळ ८ चेंडूत २६ धावा करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. त्याच्या या छोट्या पण निर्णायक खेळींमुळे भारताने सलग दुस-यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.
२०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणा-या शिवम दुबेचा प्रवास सुरुवातीला चढ-उतारांनी भरलेला होता. मात्र गेल्या तीन वर्षांत त्याने टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघात आपली जागा मजबूत केली आहे. आयपीएलमध्येही त्याने सातत्याने चांगली कामगिरी करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ट्रेनने प्रवास करणारा आणि मुंबईत कोट्यवधींची प्रॉपर्टी खरेदी करणारा हा क्रिकेटपटू सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

