Homeक्रीडासचिनने दिल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

सचिनने दिल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई : प्रतिनिधी
पारंपरिक वेशभूषा आणि मायबोलीमध्ये मास्टर ब्लास्टरने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. क्रिकेटच्या या देवाने आईचे सपत्निक केलेले चरणस्पर्श सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. सचिनने या व्हीडीओच्या माध्यमातून आपले संस्कार जपले आहेत ही खरोखरीच वाखाणण्याजोगी बाब आहे. तुम्हाला व कुटुबियांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष, आनंद, सुख, समृध्दीचे जावो, हीच प्रार्थना. अशा मराठीतील कॅप्शनसह सचिनने आपल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनने त्याच्या राहत्या घरी गुढी उभारत आपली मराठमोळी परंपरा जपली आहे. तसेच सचिन आणि पत्नी अंजली या दोघांनीही गुढी उभारल्यानंतर लाडक्या श्वानासह आईच्या पाया पडले आहेत. सचिनने त्याच्या लाडक्या श्वानाला आईच्या पाया पडण्याच्या सूचना करताक्षणी, श्वानानेही पायाजवळ जाऊन आईचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे हा व्हीडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

सचिन कायमच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असल्याकारणाने, तो आईसोबतचे अनेक क्षण कॅमे-यात कैद करतो. केवळ इतकेच नाही तर, त्याच्या इतर गोष्टीही तो चाहत्यांशी कायम शेअर करताना दिसतो..

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR