Homeक्रीडासॅम करण आयपीएलला मुकणार?

सॅम करण आयपीएलला मुकणार?

मुंबई : आयपीएल २०२६ स्पर्धेतील यंदाच्या हंगामाला २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. राजस्­थान रॉयल्­सचा संघ ३० मार्चला चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या लढतीने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्याआधी संघाला मोठा धक्का बसला असून चेन्­नई सुपरकिंग्­सच्या ताफ्यातून ट्रेडच्या माध्यमातून राजस्थान रॉयल्स संघात आलेला इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन ग्रोइन इंज्युरीमुळे स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, हा स्टार संपूर्ण हंगामाला मुकण्याची शक्यता आहे.

सॅम करन हा ५ मार्चला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये टीम इंडियाविरुद्ध खेळताना दिसला होता. पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यासारख्या संघाकडून खेळणा-या या इंग्लिश खेळाडूला आयपीएलमधील चांगला अनुभव आहे. छोटया फॉरमॅटमध्ये बॅटिंग-बॉलिंगसह सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. यंदाच्या हंगामात तो राजस्थानच्या संघाकडून पदार्पण करणार होता. पण आता दुखापतीमुळे त्याच्या स्पर्धेतील सहभाग अनिश्चित झाला आहे. संजू सॅमसनच्या बदल्यात राजस्­थान रॉयल्­सच्या संघाने सॅम करन आणि रवींद्र जडेजा या दोघांना ट्रेड डीलच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्सच्या संघातून आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते.

त्याच्या अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्सच्या संघात रवींद्र जडेजा आणि डोनोवान फरेरा यांच्या रुपात दोन अष्टपैलून खेळाडू आहेत. फरेराला राजस्थान रॉयल्­स संघाने दिल्ली कॅपिटल्­सकडून १ कोटी मूळ किंमतीसह ट्रेड केले होते. आता राजस्थान रॉयल्सच्या संघाला सॅम करनच्या जागी बदली खेळाडूचा शोध घ्यावा लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR