38.3 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडडॉ.शिवाजी कराळे यांची बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर निवड

डॉ.शिवाजी कराळे यांची बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर निवड

नांदेड : जि.प.कें.प्रा.शा.ब्रँच मुखेड येथील सहशिक्षक डॉ.शिवाजी कराळे यांची महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व पाठ्यपुस्तक संशोधन मंडळ (बालभारती) पुणे येथे इंग्रजी ३-५ व नागरिकशास्त्र ६-८ या दोन विषय समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले आहे.

डॉ.शिवाजी कराळे यांना उच्चशिक्षित,उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक म्हणून तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात ओळखले जाते. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंमलबजावणी व परिणामकारकतेचा अभ्यास या विषयावर केलेल्या संशोधनाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडने त्यांना जानेवारी २०२३ मध्ये पीएच.डी.प्रदान केली आहे. याशिवाय अनेक शैक्षणिक विषयावर त्यांचे शोध निबंध प्रकाशित झाले.

वर्तमानपत्रात स्तंभलेखन केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल जि. प. नांदेडकडून सन २०२०-२१ च्या जिल्हा गुरुगौरव पुरस्काराने तर महाराष्ट्र शासनाच्या व वतीने सन २०२१-२२ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सामाजिक कार्यातही ते सक्रिय असून सलग २२ वेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोविड १९ काळात १ लाखापेक्षा जास्तीचा निधी मुख्यमंत्री व पंतप्रधान निधीस प्रदान केला आहे.

बालभारतीवर त्यांची निवड झाल्याने जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राचा सन्मान झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या निवडीबद्दल आ.डॉ.तुषार राठोड, जि.प.नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल, शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ.सविता बिरगे, गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, विस्तार अधिकारी विठ्ठलराव वडजे, मुख्याध्यापक गोविंद चव्हाण, माधव माधसवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास पाटील, उपाध्यक्ष आशिष कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR