Homeधाराशिवशेतकरीपूत्र अमित लोकरे यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड

शेतकरीपूत्र अमित लोकरे यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड

धाराशिव : प्रतिनिधी
जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेद्वारे शेतकरीपूत्र अमित गोकुळ लोकरे यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. अमित लोकरे हे या परिक्षेत राज्यात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल त्यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. अमित लोकरे हे शेतकरी कुटुंबातील असून, त्यांचे मुळ गाव करमाळा तालुक्यातील सालसे आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण बार्शी येथे झाले.

त्यांनी अभियांत्रीकीची पदवी पुणे येथून घेतल्यानंतर त्यांनी त्यांचे सरणवाडी ता. परंडा येथील मामा तालुका कृषी अधिकारी तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायय्क बाळराजे मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परिक्षेची तयारी केली होती. अमित यांचे वडील छोटे शेतकरी होते. त्यांच्याकडे प्रवाशी वाहतूक करण्याची जीप होती. त्यांचे कोरोनामध्ये निधन झाले. आईच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत राज्यात पाचवे येऊन उपजिल्हाधिकारीपदी त्यांची निवड झाली आहे.

राज्यात पाचवा क्रमांक आल्याबद्दल अमित लोकरे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दत्ता भरणे, माजी आ. राहुल मोटे, स्वीय सहाय्यक बाळराजे मुळीक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल त्यांचे धाराशिव जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी मोहनराव मोटे, मामी कल्याणी बाळराजे मुळीक, युवराज मुळीक, ज्ञानदेव मुळीक, जयसिंग मुळीक, सुर्यकांत मुळीक आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR