34.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रशेवाळेंचे दुबईतील व्हीडीओ फारच प्रसिद्ध

शेवाळेंचे दुबईतील व्हीडीओ फारच प्रसिद्ध

वर्षा गायकवाड यांचा राहुल शेवाळेंना टोला

मुंबई : ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांचा एक वादग्रस्त व्हीडीओ व्हायरल होत आहे. या व्हीडीओवरून अनिल देसाई यांना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी टार्गेट केले. त्यावरून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी राहुल शेवाळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल शेवाळे यांचे मोठे व्हीडीओ आहेत. ते देखील बाहेर यायला हवेत. त्यांचे दुबईतील व्हीडीओ फारच प्रसिद्ध आहेत, असा टोला वर्षा गायकवाड यांनी शेवाळेंना लगावला. शेवाळे हे चेंबूरला बाबासाहेबांच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा कार्यकर्त्यांनी काय केले ते व्हीडीओ बाहेर आले पाहिजेत, असे देखील वर्षा गायकवाड म्हणाल्या.

काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेले खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस दलितविरोधी असल्याचा आरोप केला होता. वर्षा गायकवाड यांनी त्याला देखील प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस जर दलितविरोधी असती तर त्यांनी मला मुंबईचे अध्यक्षपद दिले असते का? आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील दलित आहेत.

मिलिंद देवरा यांचा बोलवता धनी कोण आहे हे सर्वांना माहिती आहे. आता ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाची भूमिका मांडावी. त्या पक्षाला सल्ले द्यावेत, असा सल्ला देखील वर्षा गायकवाड यांनी मिलिंद देवरा यांना दिला.

मिलिंदा देवरा हे काँग्रेसमध्ये असताना काही बोलले नाहीत. आता त्यांनी मोदींनी काय काम केले याच्यावर बोलावे. मुंबईसाठी केंद्राने काय केले हे बोलावे. ५० खोक्यांवर बोलावे, महापालिकेच्या निधीचे वाटप कसे केले यावर बोलावे, असा टोला देखील वर्षा गायकवाड यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR