श्रीमती सुशीलादेवी देशमुख महिला महाविद्यालयाला ‘अ’ श्रेणी 

लातूर : प्रतिनिधी
मांजरा चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचलित येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख महिला  महाविद्यालयाने शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये  आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने करण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षणमध्ये श्रीमती सुशीलादेवी देशमुख महिला महाविद्यालयाने ८५.६० टक्के गुण मिळवून ‘उत्कृष्ट’ (अ) श्रेणी प्राप्त केली आहे.
विद्यापीठाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयातील विविध विभागाची ऑनलाईन पद्धतीने पाहणी केली होती. या अंकेक्षणामध्ये अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन प्रक्रिया, अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, अभ्यासक्रमपूरक व अभ्यासक्रमेत्तर उपक्रम, विविध शैक्षणिक कार्यक्रम, संशोधन क्षेत्रातील कार्य, विद्यार्थी केंद्रीत उपक्रम, सामाजिक बांधिलकी, सामंजस्य करारांतर्गत (एमओयू) राबविण्यात आलेले उपक्रम, अभ्यासपूरक सहल विद्यार्थीनी अभिप्राय (फीडबॅक)  विद्यापीठस्तरीय गुणवत्ता, विद्यार्थीनी सहभाग व पारितोषिके, राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक, परीक्षा विभागाचे योगदान, ग्रंथालय व्यवस्था, कार्यालयीन कामकाज, वित्तीय व्यवस्थापन महाविद्यालयातील तसेच उपलब्ध भौतिक सुविधा आदी सर्व बाबींचे सखोल परीक्षण करण्यात आले.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल मांजरा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. अजय पाटील, महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. आशा मुंडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बालासाहेब भोसले, सहसमन्वयक डॉ. मल्लिकार्जुन करजगी तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी या अंकेक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता विविध उपक्रमांचे दस्तऐवजीकरण आणि नियोजनबद्ध तयारी करून हे यश मिळविण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
सदरील यश हे महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय कामकाज, पायाभूत सुविधा, विद्यार्थिनींसाठी  राबवले जाणारे विविध उपक्रम आणि संशोधन क्षेत्रातील कामगिरी या सर्व बाबींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला. विद्यापीठाच्या समितीने महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासावर समाधान व्यक्त करत ‘अ’ गुणांकन बहाल केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18
Video thumbnail
Nanded|"दोन-चार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा!" – अशोक चव्हाण संतापले
04:36
Video thumbnail
Latur|पदवी आणि UPSC-MPSC तयारी आता एकाचवेळी!;MIT चा अभिनव उपक्रम
02:07
Video thumbnail
Latur|खानापूर रस्त्यावर आशाताई भिसे आक्रमक; अधिकाऱ्यांना उतरावं लागलं मैदानात
04:49
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
17:00
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
00:00
Video thumbnail
Latur|राधिका पाटील यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी घेतली भेट
05:32
Video thumbnail
Latur|मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थितीची चाहूल;शेकडो एकर शेती अजूनही पेरणीविना
02:47
Video thumbnail
EXPLAINER | कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ? महाराष्ट्रात पावसाचं असं चित्र का?
03:22
Video thumbnail
Solapur|केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी DYFIचे अन्नत्याग आंदोलन
02:26
Video thumbnail
MNS Andolan|स्मार्ट मीटरची मनसेकडून होळी; सरकारविरोधात संताप
03:13
Video thumbnail
Latur Murder|लातूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:24
Video thumbnail
Shashikant Shinde|"दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत" – शशिकांत शिंदे
04:10

Latest news