दानपेटीतील चोरीच्या चौकशीसाठी नेमलेली एसआयटी म्हणजे थोतांड

रामरक्षा आंदोलनात उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
नागपूर : प्रतिनिधी
नागपूर येथील राममंदिरात आज शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन करीत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिरातील दान पेटीतील चोरीसाठी नेमलेली एसआयटी म्हणजे थोतांड आहे. राम मंदिराच्या दान चोरीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा. निवृत्त न्यायाधीशही निस्पृह असावेत. अभय ओक यांच्यासारखे न्यायमूर्ती नेमा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

यावेळी संजय राऊत, चंद्रकांत खैरे, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी हजर होते. ठाकरे म्हणाले की, मंदिर वही बनायेंगे.. कशाला बनाने के बाद लुटण्यासाठी का? आम्ही लुटारूंच्या विरोधात आहोत. आमची चेष्टा मस्करी करण्यापेक्षा फडणवीस यांनी लुटणा-यांच्या बाजूने की राम रक्षा करणा-यांच्या बाजूने आहात, हे स्पष्ट करावे. हे आंदोालन राम रक्षा पाठ आहे की नाही, हे बघण्यासाठी नाही. एखाद्या वर्गातील मॉनिटरसारखे बोलू नका. आज राम भक्तांना रामाचे संरक्षण करण्याची वेळ येते. भाजपच्या कारभारात करावी लागते. यापेक्षा दुर्दैव कोणते, असा सवालही उपस्थित केला.

अयोध्या, केदारनाथ मंदिर आदी ठिकाणी घोटाळे झाले. उज्जैनमध्ये घोटाळा झाला. अयोध्येत जमीन घोटाळा झाला. साधू आज राग व्यक्त करत आहेत. एका साधूने सांगितले, हे मंदिर नाही. हे पैसा गोळा करण्याचे भाजपचे केंद्र झाले आहे. एटीएम. इथे जो काही पैसा गोळा केला. त्यातून आमदार, खासदार विकत घेतले गेले. मला त्या गद्दारांनाही विचारायचे आहे. बाळासाहेबांचे विचार सोडल्याचा आरोप करत होतात. मंदिर चोराला आम्ही जाब विचारायला उभे आहोत, असेही उद्धव ठाकरे यावेळी कडाडले. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही भाजपला सवाल करा. त्यांच्या घरचे पाणके होऊ नका. गद्दाराच्या अंगात हिंदुत्वाचे रक्त असेल तर मंदिर चोरांविरोधात भूमिका स्पष्ट केली पाहिजे. जमलेल्यांच्या डोक्यावर भगव्या टोप्या नाहीत, मी काही भगवा झेंडा, भगवा झब्बा गंमत म्हणून घेतला नाही. ही काही नाटक कंपनी नाही, असेही टोला त्यांनी लगावला.

वांगचुक यांच्या समर्थनार्थ
ठाकरे सेनेचे आज आंदोलन
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रामरक्षा पठण आंदोलन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत उपोषण करणा-या सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली. रविवारी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन केले जाणार आहे. राज्यातही आंदोलन केले जावे, असे ते म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18
Video thumbnail
Nanded|"दोन-चार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा!" – अशोक चव्हाण संतापले
04:36
Video thumbnail
Latur|पदवी आणि UPSC-MPSC तयारी आता एकाचवेळी!;MIT चा अभिनव उपक्रम
02:07
Video thumbnail
Latur|खानापूर रस्त्यावर आशाताई भिसे आक्रमक; अधिकाऱ्यांना उतरावं लागलं मैदानात
04:49
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
17:00
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
00:00
Video thumbnail
Latur|राधिका पाटील यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी घेतली भेट
05:32
Video thumbnail
Latur|मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थितीची चाहूल;शेकडो एकर शेती अजूनही पेरणीविना
02:47
Video thumbnail
EXPLAINER | कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ? महाराष्ट्रात पावसाचं असं चित्र का?
03:22
Video thumbnail
Solapur|केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी DYFIचे अन्नत्याग आंदोलन
02:26
Video thumbnail
MNS Andolan|स्मार्ट मीटरची मनसेकडून होळी; सरकारविरोधात संताप
03:13
Video thumbnail
Latur Murder|लातूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:24
Video thumbnail
Shashikant Shinde|"दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत" – शशिकांत शिंदे
04:10

Latest news