श्रेयसचे शतक, पंजाबचा विजय

नवी दिल्ली : पंजाब किंग्सने करो या मरोच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा ७ गडी राखून पराभव केला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यात आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक झळकावून संघाला एक अविश्वसनीय विजय मिळवून दिला. या विजयामुळे पंजाब किंग्सचे प्लेऑफमधील आव्हान अजूनही कायम आहे. पंजाब किंग्सचे आता १४ लीग सामन्यांनंतर १५ गुण झाले असून त्यांचा नेट रन रेट +०.३०९ झाला आहे. पंजाबचा प्लेऑफमधील पुढचा प्रवास राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणा-या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल.

१९७ धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने प्रियांश आर्याला (0) बाद केले. त्यानंतर कूपर कॉनोलीही १८ धावा करून शमीचाच बळी ठरला. २२ धावांवर २ गडी गमावल्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने अवघ्या ३९ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६९ धावांची शानदार खेळी केली. त्याला अर्जुन तेंडुलकरने पायचीत केले. त्यानंतर कर्णधाराला साजेशी खेळी करत श्रेयसने ५१ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार ठोकत नाबाद १०१ धावांची मॅचविनिंग खेळी केली. सूर्यांश शेडगेने शेवटी नाबाद ९ धावा करत श्रेयसला चांगली साथ दिली. त्यामुळे पंजाबचा शानदार विजय झाला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53

Latest news