36 C
Latur
Wednesday, March 25, 2026
Homeक्रीडासंजू सॅमसंनच्या झुंजार फलंदाजीने टीम इंडिया उपांत्य फेरीत

संजू सॅमसंनच्या झुंजार फलंदाजीने टीम इंडिया उपांत्य फेरीत

डॉ. राजेंद्र भस्मे 
टी२० विश्वचषक २०२६ मधील रविवार एक मार्च हा माझ्यासाठी आणि चाहत्यांसाठी चाहत्यांसाठी चांगलाच लक्षात राहील. कोलकातामधील सुपर-८च्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला ५ विकेट्सने व चार चेंडू राखून हरवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताला १९६ धावांचे लक्ष्य मिळाले होते. संजू सॅमसनच्या उत्तम खेळीमुळे भारताने चार चेंडू शिल्लक राखत लक्ष्य गाठलेटीम इंडियाने मायदेशात सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजवर मात करत आयसीसी टी २० वर्ल्ड कप जिंकण्याच्या दिशेने पाऊल पुढे टाकलं आहे.

सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात जबरदस्त विजय मिळवत हेआव्हान १९.२ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून पूर्ण केलं. संजू सॅमसन या भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. संजूने ५० चेंडू बारा चौकार व चार षटकारसह नॉट आऊट ९७ रन्स करुन भारताला विजयी केले. संजूला या विजयासाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच या सामन्यानंतर सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झाले. टीम इंडियाने विंडीजला पराभूत करत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असा होता.

मात्र संजू सॅमसन याने इतर ५ सहका-यांच्या मदतीने धमाका केला त्याला अभिषेक शर्मा(१०) ईशान किशन(१०) कर्णधार सुर्यकुमार यादव(१८) टिळक वर्मा (२७) हार्दिक पंड्या (१७)आणि शिवम दुबे(८) यांच्या मदतीनेभारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिले. टीम इंडियाआधी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने सेमी फायनलचे तिकीट मिळवले. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड कलकत्त्यात ईडन गार्डनवर ४ मार्चला भिडणार आहेत. तर टीम इंडियाचं सेमी फायनलमध्ये त्यांचा इंग्लंड विरुद्ध वानखेडे वर मुंबईत सामना ५ मार्चला होणार यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाल या विजयासह भारताने १० वर्षांपूर्वीचा हिशोबही चुकता केला. या विजयासह, भारताने सहाव्यांदा टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि इंग्लंड आणि पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी केली.

भारताने २००७, २०१४, २०१६, २०२२, २०२४ आणि २०२६ असे ६वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला २०२२ मध्ये इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

दरम्यान, सुरेश रैनानंतर टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा संजू सॅमसन दुसरा भारतीय फलंदाज ठरला. २०१० मध्ये रैनाने १०१ धावा केल्या होत्या, तर सॅमसन ९७ धावांवर नाबाद राहिला. या विक्रमी खेळीमुळे भारताच्या उपांत्य फेरीच्या स्वप्नांना नवीन पंख मिळाले आहेत.

२०१६ च्या टी२० विश्वचषकातील उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजने भारताचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंग केले होते. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारताने १९२ धावा केल्या होत्या; तथापि, वेस्ट इंडिजने १९.४ षटकांत १९३ धावांचे लक्ष्य गाठून विजय मिळवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR