समुद्राचे खारे पाणी गोड करणारा प्रकल्प ४ वर्षांत पूर्ण होणार!

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईला विविध ७ धरणांमधून दररोज सुमारे ४ हजार १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात असला तरी शहराची एकूण गरज ४ हजार ६६५ दशलक्ष लिटर इतकी आहे. ही तूट भरून काढण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा २०० एमएलडी क्षमतेचा नि:क्षारीकरण प्रकल्प मनोरी येथे उभारण्यात येत असून येत्या ४ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली.

समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी आज मनोरी येथील नि:क्षारीकरण प्रकल्पाबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सामंत यांनी नि:क्षारीकरण प्रकल्पामुळे मुंबईला अतिरिक्त २०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. प्रकल्प सुरू झाल्यानंतर १ हजार लिटर पाण्यासाठी सुमारे ३५ रुपये म्हणजेच प्रतिलिटर १५ ते १७ पैसे इतका खर्च अपेक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मनोरीतील नि:क्षारीकरण प्रकल्प संयुक्त भागीदारी तत्त्वावर विकसित करण्यात येत असून यासाठी मे. जीव्हीपीआर इंजिनियर्स लिमिटेड आणि मे. आय. डी. ई. टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त भागीदारी उपक्रमाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयाकडून किनारपट्टी नियमन क्षेत्र संदर्भातील आवश्यक मान्यता प्राप्त झाली आहे, असे सामंत म्हणाले.

४ हजार ७७ कोटींचा प्रकल्प
प्रकल्पाच्या बांधकामाची किंमत ४ हजार ७७ कोटी रुपये असून त्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. कार्यादेशानुसार प्रकल्पाच्या बांधकामाचा कालावधी ४८ महिने असून त्यानंतर २० वर्षांचा प्रचलन आणि परिचालन कालावधी निश्चित करण्यात आला असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
36:07
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51
Video thumbnail
Latur|स्मार्ट वीज मीटरवरून मनसे आक्रमक; किल्लारीत जोरदार आंदोलन!
04:33
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:38:10
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; जेसीबीची धडक कारवाई
04:10
Video thumbnail
Latur| अखेर शेतकऱ्याला परत मिळाली बैलजोडी!
04:27
Video thumbnail
शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्फोटक पत्रकार परिषद लाईव्ह
08:29
Video thumbnail
लातूर-उदगीर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; कार, ऑटो आणि दुचाकीच्या धडकेत तिघे गंभीर जखमी
00:53
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00

Latest news