सरकारच्या इंजिनमधील तेल पण संपले का ?

मुंबई : गेल्या पाच दिवसांत केंद्र सरकारने दोन वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. १५ मे रोजी देशात पेट्रोलच्या दरात ३ रुपयांनी आणि डिझेलच्या दरात ३.११ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी (ता. १९ मे) पुन्हा एकदा देशातील प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वेगवेगळी वाढ करण्यात आली.

एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असतानाच दुसरीकडे मात्र, राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंप किंवा डिझेल पंपावर इंधन नसल्याकारणाने नागरिक रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. तर जळगावमधील एरंडोल तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्याकारणामुळे पंपावर काम करणा-यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे इंधन नसल्याकारणामुळे नागरिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. राज्यात इंधन नसल्याकारणामुळे घडणा-या विविध घटनांमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘‘जळगावमध्ये पेट्रोल नाही म्हणून काही अज्ञातांनी पंपावर काम करणा-या एका कर्मचा-याच्या पोटात चाकू खुपसला. बुलडाण्यात पेट्रोल मिळण्याच्या आशेवर लोक १२ तास लाईनमध्ये उभे राहिले, अकोल्याच्या वाशिम नाका येथे पेट्रोल-डिझेल मिळावे म्हणून हाणामारी. नागपूरमध्ये बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे डिझेल नाहीू चाललंय तरी काय? डबल इंजिन सरकारच्या इंजिनमधील तेल पण संपले का?’’ असे लिहित संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे याबाबत शासन किंवा सरकारमधील नेतेमंडळी नेमके काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18
Video thumbnail
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात जळकोट तालुक्यात 'केमिस्ट'चा कडकडीत बंद; तहसीलदारांना निवेदन!
02:05
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|ED च्या रडारावर प्रा. शिवराज मोटेगावकरांची बेहिशोबी संपत्ती?
05:06
Video thumbnail
ब्रेकिंग : मोटेगावकरांच्या पत्नीला देखील CBI ची नोटीस
02:09
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46

Latest news