साखर साठ्यावर केंद्राचे पुन्हा निर्बंध

व्यापा-यांना आता १५ दिवसांचीच मुभा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सणासुदीच्या काळात साखरेचा अनावश्यक साठा आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने व्यापा-यांच्या साखर साठयावर पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. १५ ऑक्टोबरपासून व्यापा-यांना साखर मिळाल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त १५ दिवसच साठवता येणार असून, कोणत्याही वेळी १ हजार क्विंटलपेक्षा अधिक साठा ठेवता येणार नाही. हे निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.

१५ सप्टेंबरपासून लागू असलेल्या नियमांनुसार व्यापा-यांना साखर मिळाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांपर्यंत साठा ठेवण्याची आणि कमाल २ हजार क्विंटल साठवण्याची मर्यादा होती. आता केंद्राने ही मुदत निम्म्यावर आणत साठयाची कमाल मर्यादाही १ हजार क्विंटल केली आहे. साखरेचा अनावश्यक साठा, साठेबाजी आणि सट्टेबाजीला आळा घालण्याबरोबरच कारखान्यांपासून व्यापा-यांमार्फत ग्राहकांपर्यंत साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवणे, हा या निर्णयामागील उद्देश आहे.

कोलकाता, आसामला २ हजार क्विंटलची मर्यादा
कोलकाता आणि त्याच्या विस्तारित महानगर क्षेत्रासह आसाममध्ये साखर साठवण्याची कमाल मर्यादा २ हजार क्विंटल ठेवण्यात आली आहे. कोलकाता हे पूर्व आणि ईशान्य भारतासाठी साखर वितरणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. तसेच आसाममधील भौगोलिक परिस्थिती आणि वाहतुकीच्या अडचणी लक्षात घेऊन या भागांना अतिरिक्त साठा मर्यादा देण्यात आली आहे.

किरकोळ साखरेच्या किमतीत १५ टक्के घट
सरकारच्या माहितीनुसार ऑगस्टमधील उच्चांकी पातळीच्या तुलनेत किरकोळ साखरेच्या किमतीत १५ टक्के घट झाली आहे. कारखाना पातळीवरील साखरेच्या दरातही सुमारे २८ टक्के घट झाली असून, गेल्या तीन आठवड्यांपासून हे दर स्थिर आहेत. या दरकपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना करण्यात आले आहे. नवीन साखर हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. ऊस उत्पादकांचे हित आणि ग्राहकांना वाजवी दरात साखर उपलब्ध होणे, यामध्ये समतोल राखण्यासाठी बाजारातील साखरेची उपलब्धता, साठा आणि दरांवर सरकार लक्ष ठेवणार आहे.

 

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|किनवट तालुक्यात पीक कापणी प्रयोगाला सुरुवात; ९ महसूल मंडळांत १०८ ठिकाणी होणार प्रयोग
01:21
Video thumbnail
Dharashiv|ऊसाला ५ हजार पहिली उचल द्या! धाराशिवमध्ये शेतकरी संघटना आक्रमक
03:37
Video thumbnail
Latur|लातूरकरांना पाण्यासाठी आणखी प्रतीक्षा! १ ऑक्टोबरपासून सहा दिवसांआड पाणीपुरवठा
02:54
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीविरोधात जिल्हा उपनिबंधक ॲक्शन मोडवर; लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी धाडी
03:14
Video thumbnail
Latur|कोयता गँगची दहशत अन् पोलिसांचा दणका! आरोपींची त्याच भागात धिंड
06:06
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात उलटी हलगी आंदोलन
03:32
Video thumbnail
हिमायतनगर तहसीलसमोर शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण; तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली
02:55
Video thumbnail
Latur|शेतकऱ्याची नजर पडली अन् हरणाचा जीव वाचला; वनविभागाचं रेस्क्यू ऑपरेशन
01:18
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती
02:36
Video thumbnail
Latur|CCTV फुटेजच्या आधारे तिन्ही आरोपी अटकेत; ठाकरे चौकातील हल्ल्याचा पोलिसांनी लावला छडा
01:57
Video thumbnail
Maharashtra Drought 2026 | 265 तालुके दुष्काळग्रस्त | शेतकऱ्यांना मदत कधी? | मुद्दा महाराष्ट्राचा
57:19
Video thumbnail
कोयता गँगची दहशत पुन्हा? दोन विद्यार्थी जखमीविद्यार्थ्यांवर हल्ला अन् CCTV मध्ये थरार; लातुरात खळबळ
00:33
Video thumbnail
Latur|पाककलेतून आरोग्याचा संदेश; ६९ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
04:15
Video thumbnail
Latur|७ गाड्या, ४० जवान, दीड लाख लिटर पाणी; अखेर आगीवर नियंत्रण
03:57
Video thumbnail
Latur|१३ तासांची झुंज! अखेर सक्रॅप मार्केटमधील आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश
01:42

Latest news