तावरजा मध्यम प्रकल्पावरील २० गावांचा पाणीपुरवठा सुरळीत करा

लातूर : प्रतिनिधी
तावरजा मध्यम प्रकल्पावरून लातूर तालुक्यातील सुमारे वीस गावांना पाणीपुरवठा करणारी वीस खेडी पाणीपुरवठा योजना गेल्या काही वर्षांपासून पाईपलाईन दुरुस्ती तसेच विविध तांत्रिक कारणांमुळे बंद आहे. त्यामुळे संबंधित गावांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, तावरजा मध्यम प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
माजी आमदार धिरज देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले. तावरजा मध्यम प्रकल्पातून संबंधित गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली पाईपलाईन अनेक ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता आहे. तसेच योजनेतील काही तांत्रिक अडचणी दूर करणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा योजना बंद असल्यामुळे नागरिकांना पर्यायी स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पाईपलाईनची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि तावरजा मध्यम प्रकल्पावरील वीस खेडी पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू करून संबंधित गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|किनवट तालुक्यात पीक कापणी प्रयोगाला सुरुवात; ९ महसूल मंडळांत १०८ ठिकाणी होणार प्रयोग
01:21
Video thumbnail
Dharashiv|ऊसाला ५ हजार पहिली उचल द्या! धाराशिवमध्ये शेतकरी संघटना आक्रमक
03:37
Video thumbnail
Latur|लातूरकरांना पाण्यासाठी आणखी प्रतीक्षा! १ ऑक्टोबरपासून सहा दिवसांआड पाणीपुरवठा
02:54
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीविरोधात जिल्हा उपनिबंधक ॲक्शन मोडवर; लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी धाडी
03:14
Video thumbnail
Latur|कोयता गँगची दहशत अन् पोलिसांचा दणका! आरोपींची त्याच भागात धिंड
06:06
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात उलटी हलगी आंदोलन
03:32
Video thumbnail
हिमायतनगर तहसीलसमोर शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण; तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली
02:55
Video thumbnail
Latur|शेतकऱ्याची नजर पडली अन् हरणाचा जीव वाचला; वनविभागाचं रेस्क्यू ऑपरेशन
01:18
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती
02:36
Video thumbnail
Latur|CCTV फुटेजच्या आधारे तिन्ही आरोपी अटकेत; ठाकरे चौकातील हल्ल्याचा पोलिसांनी लावला छडा
01:57
Video thumbnail
Maharashtra Drought 2026 | 265 तालुके दुष्काळग्रस्त | शेतकऱ्यांना मदत कधी? | मुद्दा महाराष्ट्राचा
57:19
Video thumbnail
कोयता गँगची दहशत पुन्हा? दोन विद्यार्थी जखमीविद्यार्थ्यांवर हल्ला अन् CCTV मध्ये थरार; लातुरात खळबळ
00:33
Video thumbnail
Latur|पाककलेतून आरोग्याचा संदेश; ६९ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
04:15
Video thumbnail
Latur|७ गाड्या, ४० जवान, दीड लाख लिटर पाणी; अखेर आगीवर नियंत्रण
03:57
Video thumbnail
Latur|१३ तासांची झुंज! अखेर सक्रॅप मार्केटमधील आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश
01:42

Latest news