सीआरपीएफ आरटीसीमध्ये ८८ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

लातूर : प्रतिनिधी
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ८८ व्या स्थापना दिनानिमित्त २७ जुलै रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर येथील नवआरक्षी प्रशिक्षण केंद्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्राची एकता, अखंडता आणि अंतर्गत सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणा-या सीआरपीएफच्या अमर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी पोलीस दलातील अधिकारी, जवान, नवप्रविष्ठ आरक्षी  तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस उपमहानिरीक्षक तथा आरटीसीचे प्राचार्य अमीरुल हसन अन्सारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सीआरपीएफच्या गौरवशाली परंपरा, अदम्य शौर्य, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेप्रती असलेल्या अखंड बांधिलकीचा गौरव केला. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस दलाने दिलेल्या उल्लेखनीय योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला.
केंद्रीय राखीव पोलीस बल हे देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे प्रमुख बल असून दहशतवादविरोधी कारवाया, नक्षलविरोधी मोहिमा, शांततापूर्ण निवडणूक पार पाडणे, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत व बचाव कार्यात नेहमीच तत्परतेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आले आहे, असे त्यांनी सांगितले. स्थापना दिनाचे औचित्य साधून अधिकारी व जवानांमध्ये संघभावना, परस्पर समन्वय आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्व खेळाडूंनी उत्साहाने सहभाग नोंदवून उत्कृष्ट क्रीडाभावना, शिस्त आणि संघभावनेचे दर्शन घडवले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना यावेळी गौरविण्यात आले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|MH-CET पेपरही फुटला? 99 पर्सेंटाइलवरून काँग्रेसचा मोठा आरोप!
02:16
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये चोरट्यांचा धडाका! एका रात्रीत सलग चार दुकाने फोडली
01:52
Video thumbnail
८ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व तपासणी शिबिर
13:50
Video thumbnail
Solapur|उजनी धरण 100 टक्के भरले; भीमा नदीत विसर्ग सुरू
00:23
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप!
08:31
Video thumbnail
Latur|१ ऑगस्टपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा; मातंग समाजाचा इशारा
05:28
Video thumbnail
Latur|किड्स इन्फो पार्कजवळ एसटी आणि स्कूल बसचा अपघात; काही जण किरकोळ जखमी!
00:40
Video thumbnail
Latur|वाहतूक कोंडीला ब्रेक लावण्यासाठी लातुरात मोठा ड्राइव्ह; अतिक्रमणावर कारवाई सुरू!
02:58
Video thumbnail
Nanded|डिजिटल अरेस्टच्या नावाने सायबर ठगांचा नवा डाव; नांदेडमध्ये ५१ लाखांची फसवणूक
03:31
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या मुद्द्यावर नगरसेवकही रस्त्यावर; महामोर्चात सक्रिय सहभाग!
03:13
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणासाठी लातूरमध्ये हजारोंचा एल्गार; महामोर्चाला मोठा प्रतिसाद!
03:32
Video thumbnail
CJP Protest|विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट? शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
12:07
Video thumbnail
Latur|लातुरात गोर बंजारा कवींचा जल्लोष; मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन!
00:43
Video thumbnail
Latur|मराठवाड्याच्या वीर सुपुत्राला मानवंदना; पानगावात कारगिल शहीद बालाजी माले यांचे स्मरण!
01:11
Video thumbnail
Latur|विठुरायाच्या भक्तांसाठी मनसेची सेवा; अन्नछत्रासह मोफत आरोग्य तपासणी!
02:53

Latest news