34.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रसोने आणि चांदीच्या किमतीत घसरण

सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण

जळगाव : सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे या दागिन्यांच्या किमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या. गेल्या आठवड्यात सोन्याने २,४०० डॉलर प्रति औंसपेक्षा अधिक उसळी घेतली होती.

पण भारतीय बाजारात पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. पण याचा अर्थ मौल्यवान धातूंच्या किमती ७२ हजारांच्या खाली आल्या असा नाही.

मार्चनंतर एप्रिल महिन्यात सोन्याने मोठी घोडदौड केली. गेल्या आठवड्यात सोने जवळपास दोन हजारांनी महागले. तर त्यात ४३० रुपयांची घसरण झाली. या आठवड्यात सोमवारी सोने ५५० रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने ६७,७०० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३,८४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

चांदीने दिला मोठा दिलासा
चांदीने गेल्या आठवड्यात १५०० रुपयांची आघाडी घेतली खरी पण त्यानंतर सोन्याप्रमाणे चांदीच्या किमतीत कोणतीच घडामोड दिसली नाही. १७ एप्रिल रोजी चांदी ५०० रुपयांनी स्वस्त झाली होती. १८, १९ आणि २० एप्रिल रोजी चांदीने दरवाढीला ब्रेक दिला. होता. तर या आठवड्यात पहिल्याच दिवशी चांदीत १ हजारांची पडझड झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ८५,५०० रुपये आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR