स्वदेशी सुसाईड ड्रोन लवकरच सेना दलात

नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारतीय सेना स्वदेशी ‘सुसाइड ड्रोन’ म्हणजेच लोइटरिंग म्युनिशनची मोठी खेप खरेदी करण्याच्या तयारीत आहे. हे आत्मघाती ड्रोन स्फोटकांनी सज्ज असतील आणि शत्रूच्या हद्दीत घुसून त्यांच्या ठिकाणांचा पूर्णपणे नाश करतील.

हे ड्रोन असे असतील की, जॅमिंग (रडार सिग्नल अडवणे) आणि स्पूफिंग (खोटे रडार सिग्नल पाठवणे) अशा परिस्थितीतही ते आपले लक्ष्य अचूकपणे साध्य करू शकतील. म्हणजेच शत्रूच्या सैन्याला याची चाहूलही लागणार नाही आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले जातील. या मोठ्या प्रकल्पासाठी लवकरच लष्कराकडून टेंडर जारी होण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी अनेक भारतीय कंपन्या पुढे येणार आहेत. यामुळे परदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी होईल आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला मोठी चालना मिळेल. या ऑर्डरमुळे एक मजबूत स्वदेशी औद्योगिक इकोसिस्टम तयार होईल, ज्यामुळे लष्कराला गरज भासल्यास भारतीय कंपन्या तात्काळ अशा प्रणाली विकसित करून पुरवू शकतील.

रु. २,००० कोटींचा करार
भारतीय कंपन्या देशातच डिझाइन व विकसित केलेल्या लोइटरिंग म्युनिशनचा पुरवठा करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सुरुवातीला हा करार सुमारे २,००० कोटी रुपयांचा असेल आणि पुढील काही वर्षांत त्यामध्ये अनेक पटींनी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण भारतीय सेना आपल्या विविध युनिट्सना ‘सुसाइड ड्रोन’ किंवा लोइटरिंग म्युनिशनने सुसज्ज करण्याच्या योजनेवर काम करत आहे, जेणेकरून कमी अंतरावर किंवा शत्रूच्या प्रदेशात खोलवर घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान करता येईल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
04:10:56
Video thumbnail
Latur|उजनी जि.प. शाळेत सीजीपीची एन्ट्री! अभिजीत दिपके यांनी घेतला थेट आढावा
04:54
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
00:00
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59

Latest news