हातपंप दुरुस्तीसाठी माराव्या लागणार उदगीरला चकरा

जळकोट : ओमकार सोनटक्के
लातूर जिल्ह्यात हातपंप दुरुस्तीसाठी आवश्यक ट्रायसेम यांची संख्या अपुरी झाली आहे. या कारणाने आता दहा तालुक्यांतील हातपंप दुरुस्ती पथकांची संख्या आता ५ इतकी करण्यात आली आहे . यामुळे आता प्रत्येक तालुक्यास हातपंप पथक राहणार नाही तर फक्त ५ ठिकाणी हे पथक उपलब्ध होणार आहे. यामुळे जळकोट पंचायत समितीजवळ हातपंप दुरुस्ती वाहन असूनही केवळ ट्रायसेम नसल्यामुळे जळकोट येथील हातपंप दुरुस्तीचे वाहन आता जिल्हा परिषदेकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जळकोट पंचायत समिती अस्तीत्वात आल्यापासून प्रथमच जळकोट पंचायत समितीजवळ हातपंप दुरुस्ती वाहन असणार नाही .
जळकोट तालुक्यात प्रत्येक गावामध्ये हातपंप आहेत. उन्हाळ्यात नागरिक याच हातपंपाचा वापर करत असतात. अनेकदा हे हातपंप नादुरुस्त होतात. हातपंप नादुरुस्त झाल्यास हे हातपंप दुरुस्त करण्यासाठी जळकोट पंचायत समितीत हातपंप दुरुस्ती विभाग कार्यरत आहे. या अंतर्गत एक ट्रायसेम व अन्य काही कर्मचारी काम करीत असतात तसेच यासाठी हातपंप दुरुस्ती वाहनही असते जळकोट पंचायत समितीस शासनाने स्वतंत्र हातपंप दुरुस्ती वाहन दिले होते.
विविध गावातील सरपंचांनी हातपंप दुरुस्तीची मागणी केल्यानंतर गटविकास अधिकारी या हातपंप विभागास हातपंप दुरुस्तीचे आदेश दिल्यानंतर संबंधित गावातील हातपंप दुरुस्तीसाठी हे पथक जात असे मात्र जळकोट पंचायत समितीमधील ट्रायसेम हे सेवानिवृत्त झाले . यानंतर सरकारने ट्रायसेमची भरतीच केली नाही. यामुळे हे पद रिक्त राहिले. यासोबतच पंचायत समितीमधील अन्य हातपंप विभागातील कर्मचारीही सेवानिवृत्त झाले.  ट्रायसेम नसल्यामुळे हातपंप दुरुस्तीचे काम ठप्प झाले .
उपअभियंता यांत्रिकी जिल्हा परिषद लातूर एसबी सर्जे यांनी पत्र काढून जळकोट पंचायत समितीचे हातपंप दुरुस्तीचे वाहन सध्या असलेल्या वाहन चालकासह यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद लातूर येथे जमा करावे असे आदेश गटविकास अधिकारी जळकोट यांना दिले आहेत तसेच जळकोट तालुक्यातील हातपंप नादुरुस्त झाल्यास दुरुस्तीबाबत तालुक्यासाठी संलग्नित केलेल्या पंचायत समिती कार्यालयाशी पत्र व्यवहार करून दुरुस्तीची कामे करून घ्यावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामुळे आता जळकोट तालुक्यातील हातपंप नादुरुस्त झाल्यास उदगीर पंचायत समितीशी संपर्क साधावा लागणार आहे .
जळकोट पंचायत समितीचे हातपंप दुरुस्तीचे वाहन काढून घेणे अत्यंत चुकीचे आहे. सरकारने हातपंप दुरुस्ती विभाग आणखीन सुसज्ज करणे आवश्यक होते मात्र हातपंप दुरुस्ती वाहन जमा करण्याचे आदेश दिले आहेत जर ट्रायसेम नसेल तर दुसरा ट्रायसेम या ठिकाणी नियुक्त करणे गरजेचे आहे. नवीन ट्रायसेम नियुक्त करणे सोडून येथील वाहन तसेच कर्मचा-यासह दुसरीकडे पाठवणे चुकीचे आहे. याचा परिणाम तालुक्यातील पाणीटंचाईवर होणार आहे. यामुळे संबंधित विभागाने याचा फेरविचार करावा.
-श्रीमती नागेश्वरी सचिन केंद्रे  (जिल्हा परिषद सदस्या जळकोट)
तीन तालुक्यांसाठी एकच पथक अपुरे पडणार
प्रशासनाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हातपंप विभाग कार्यरत ठेवणे आवश्यक आहे. विभाग जर नसेल तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावणार आहे. ट्रायसेम सेवानिवृत्त झाल्यास त्या ठिकाणी तात्काळ नवीन ट्रायसेम नियुक्त करणे गरजेचे आहे. ट्रायसेम नाही म्हणून जळकोट पंचायत समितीचे वाहन तसेच वाहन चालक इतर ठिकाणी पाठविणे चुकीचे आहे. जळकोट तालुक्यातील सरपंच मंडळींनी हातपंप दुरुस्त करण्यासाठी कुठे चकरा मारायच्या. उदगीर, देवणी ,जळकोट असे तीन तालुके हातपंप दुरुस्तीसाठी एकत्र करण्यात आले आहेत. टंचाईच्या काळात तीन तालुक्यांसाठी एक पथक कसे काय उपलब्ध होऊ शकेल. याचाही विचार करण्याची गरज आहे .
  -श्रीमती संध्याताई रमेश चोले (सरपंच कोळनूर)

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18
Video thumbnail
Nanded|"दोन-चार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा!" – अशोक चव्हाण संतापले
04:36
Video thumbnail
Latur|पदवी आणि UPSC-MPSC तयारी आता एकाचवेळी!;MIT चा अभिनव उपक्रम
02:07
Video thumbnail
Latur|खानापूर रस्त्यावर आशाताई भिसे आक्रमक; अधिकाऱ्यांना उतरावं लागलं मैदानात
04:49

Latest news