सना : वृत्तसंस्था
येमेनच्या हुती बंडखोरांनी लाल समुद्रात मॅझिक सीज नावाच्या जहाजावर हल्ला करुन त्याला जलसमाधी दिली. हे जहाज लायबेरियाचा झेंडा लावलेले होते आणि युनानी मालकीचे एक बल्क कॅरिअर होते. येमेनच्या हुती बंडखोरांनी हा हल्ला केला. या जहाजावर हल्ला करण्यासाठी हुतींनी ड्रोन, मिसाईल, रॉकेटचलित ग्रेनेड आणि छोट्या शस्रास्रांचा वापर केला.
या ब्लास्टच्या काही सेंकदातच या जहाजाला आग लागली. मॅजिक सीज नावाचे जहाज दोन तुकड्यात विभागून लाल सागरात बुडाले. हुतींनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. दावा केला आहे की या जहाजाने इस्रायलवर त्यांनी लावलेल्या नाकाबंदीचे उल्लंघन केले होते. हुतींच्या हल्ल्यामुळे जहाजावरील २२ चालक दल सदस्यांना सुखरुप वाचवण्यात आले आहे.
इस्राईल आणि हमास संघर्षात हुती विद्रोही लाल सागरात व्यापारी जहाजांना लक्ष्य करीत आहेत. इस्राईल-हमास संघर्षात हुती हमासच्या बाजूने लढत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. हुतींच्या या पावलाने मध्य पूर्वेतील आधी जटील असलेल्या स्थितीला आणखीन अडचणीत आणले आहे.
















