लातूर : प्रतिनिधी
शहरालगत असलेल्या वरवंटी शिवारातील कचरा डेपोला दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली होती. कचरा डेपोने पेट घेतल्यानंतर कांही वेळातच आग सर्वदूर पसरली आणि आगीने रौद्र रुप धारण केले. आगीची माहिती मिळताच लातूर शहर महानगरपालिकेचे अग्निशन दल घटनास्थळी पोहोचले. तब्बल १३ तासांच्या अथक प्रयत्नानंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात आली.
अग्निशमन दलाच्या ४ गाड्या, आणि १८ हुन अधिक कर्मचा-यांनी सलग १३ तास झुंज दिल्यानंतर अखेर पहाटे दोनच्या सुमारास आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. ३८ तास उलटून गेल्या नंतरही आग अजून धूमसत असल्याने धुराचे लोट कमी झाले नाहीत.
















