५१ प्रवाशी घेऊन धावणारी बस उलटली; जिंतूर-परभणी महामार्गावरील चांदज जवळील घटना

जिंतूर : छत्रपती संभाजीनगर येथून वसमतकडे जाणारी बस जिंतूर-परभणी महामार्गावरील चांदज गावाजवळ गुरुवार, दि.३० जुलै रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उलटली. या बसमध्ये तब्बल ५१ प्रवाशी होते. बस पलटी होताच प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. या घटनेत बसमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर काहींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान या अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथून वसमतकडे (एम.एमच. २० बीएल २२४०) ही बस निघाली होती. जिंतूर येथून पुढील प्रवासासाठी बस निघाली असताना जिंतूर-परभणी महामार्गावरील चांदज गावाजवळ बस रस्त्याच्या डाव्या बाजुला जावून उलटली. बस पलटी होताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ बचावकार्य सुरू केले. या अपघातात अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच एस. टी. महामंडळाचे जिंतूर आगार प्रमुख गिलचे, विभागीय वाहतूक अधिकारी संदीप साळुंखे, लेखाकार पांचाळ, वाहतूक लिपिक गजानन घुगे, अतुल जैन यांनी घटनास्थळी भेट देवून बचाव कार्याचा आढावा घेतला. जखमी प्रवाशांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी त्यांनी आवश्यक ती व्यवस्था केली. या अपघातात बस चालक जी. एस. नागरगोजे, वाहक पी. एम. गोरे बचावले असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या अपघातामुळे काही काळ जिंतूर-परभणी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे वाहतूक नंतर सुरळीत करण्यात आली. या अपघातात जीवितहानी टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news