६ बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला मंजुरी

ठाकरेंना धक्का, लोकसभा सचिवालयाने दिली मंजुरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या ६ फुटीर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाने मोठा निर्णय घेत त्यांच्या गटाच्या विलिनीकरणाला मंजुरी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे ६ खासदार शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत खासदार बनले आहेत.

ठाकरेंच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर या ६ खासदारांनी वेगळा गट स्थापन केला. नंतर या गटाने शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरण केले. आता या विलिनीकरणावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे या सहाही खासदारांची खासदारकी वाचली असून ते आता शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार म्हणून काम करणार आहेत.

यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या लोकांनी या खासदारांना निवडून दिले, त्यांची कामे होणे महत्त्वाचे आहे. आमच्याकडे आलेल्या ६ खासदारांनी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना मोठा विकासनिधी दिला जाईल, असे म्हटले. दरम्यान, लोकसभा सचिवांच्या निर्णयामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडून आलेल्या ६ खासदारांनी त्यांची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या ६ खासदारांनी आधी आपला एक वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर या गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली. नंतर या गटाने शिंदेच्या शिवसेनेत अधिकृतपणे विलिनीकरणाचा निर्णय घेतला. यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला. मात्र, अखेर लोकसभा अध्यक्षांनी या ६ खासदारांच्या विलिनीकरणाला मान्यता दिली.

ठाकरेंचे कार्यालय
काढून घेतले जाणार
ठाकरेंच्या ९ खासदारांपैकी दोन तृतीयांश ६ खासदार फुटल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाचे लोकसभेतील कार्यालय काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. कारण नियमानुसार एखाद्या पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभेतील मिळून किमान ५ खासदार असणे गरजेचे आहे तरच त्यांना एक कार्यालय दिले जाऊ शकते. पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेत केवळ ३ खासदार उरले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18
Video thumbnail
Nanded|"दोन-चार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा!" – अशोक चव्हाण संतापले
04:36
Video thumbnail
Latur|पदवी आणि UPSC-MPSC तयारी आता एकाचवेळी!;MIT चा अभिनव उपक्रम
02:07
Video thumbnail
Latur|खानापूर रस्त्यावर आशाताई भिसे आक्रमक; अधिकाऱ्यांना उतरावं लागलं मैदानात
04:49
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
17:00
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
00:00
Video thumbnail
Latur|राधिका पाटील यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी घेतली भेट
05:32
Video thumbnail
Latur|मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थितीची चाहूल;शेकडो एकर शेती अजूनही पेरणीविना
02:47
Video thumbnail
EXPLAINER | कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ? महाराष्ट्रात पावसाचं असं चित्र का?
03:22
Video thumbnail
Solapur|केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी DYFIचे अन्नत्याग आंदोलन
02:26
Video thumbnail
MNS Andolan|स्मार्ट मीटरची मनसेकडून होळी; सरकारविरोधात संताप
03:13
Video thumbnail
Latur Murder|लातूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:24
Video thumbnail
Shashikant Shinde|"दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत" – शशिकांत शिंदे
04:10

Latest news