मदतीच्या प्रतीक्षेत ६ फार्मर आयडी धारक शेतकरी आहेत तर जळकोट तालुक्यामध्य २६ हजार ४५० शेतक-यांची अनुदानासाठी यादी तयार करण्यात आली आहे. शेतक-यांची संख्या आणि फार्मर आयडीची संख्या बघितली तर जवळपास ४ हजार शेतक-याजवळ फार्मर आयडी नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जळकोट तालुक्यातील अनेक शेतकरी हे फार्मर आयडी नसल्यामुळे अनुदानापासून वंचित राहणार आहेत. जळकोट तालुक्यामध्ये २६४५० शेतकरी आहेत. यापैकी अत्यल्प भूधारक शेतक-यांची संख्या २१०५ एवढी आहे तर अल्पभूधारक शेतक-यांची संख्या २० हजार एवढी आहे तर भूधारक शेतक-यांची संख्या ३५२९ एवढी आहे.
















