भिवंडीत इमारत कोसळून १० ठार

भिवंडी : भिवंडीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री एक चार मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, ४ ते ५ जण अद्याप ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दुर्घटनाग्रस्त इमारतीपर्यंत यंत्रणा पोहोचण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली एक चाळ जेसीबीच्या साहाय्याने तोडून बचाव पथकाने आत प्रवेश मिळवला.

भिवंडीतील इमारत दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याची माहिती त्यांनी दिली. जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही मुख्यमंर्त्यांनी व्यक्त केली.

गिरीश महाजनांकडून घटनास्थळाचा आढावा
भिवंडीतील इमारत कोसळल्याच्या भीषण दुर्घटनेनंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. या इमारतीबाबत प्रशासनाने आधीच धोकादायक असल्याची पूर्वकल्पना देत दोन वेळा नोटीस बजावली होती आणि येथील सर्व ३० कुटुंबांना सुरक्षितपणे बाहेर काढले होते; मात्र, दुर्दैवाने काही जण पुन्हा आत गेल्याने त्यांच्यावर काळाने घाला घातला, अशी माहिती महाजन यांनी दिली.

अद्यापही ढिगा-याखाली एनडीआरएफकडून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असून, दुर्घटनेमुळे शेजारील दुसरी इमारतही खचल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने तीदेखील तातडीने रिकामी केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून त्यांना शासनाकडून लवकरच मदत दिली जाईल, असे महत्त्वपूर्ण आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news