राघव चड्ढा यांनी पेपरफुटीवर मौन सोडले

नवी दिल्ली : नीट पेपरफुटीच्या मुद्यावरून भाजप खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेत विरोधकांना सुनावले. या मुद्यावर ते इतके दिवस शांत का होते त्याचाही खुलासा त्यांनी केला. याआधी मी विरोधी पक्षात होतो तेव्हा माझे काम प्रश्न विचारणे होते आणि मी ते प्रामाणिकपणे केले. आता मी सत्ताधारी बाकांवर आहे. त्यामुळे माझी भूमिका बदलली. माझी जबाबदारी आता फक्त प्रश्न विचारण्याची नव्हे तर तोडगा काढण्याचीही आहे असे खासदार राघव चड्ढा यांनी म्हटले.

सभागृहात राघव चड्ढा यांनी पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांना होणा-या त्रासावर दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले की, मी काही काळ उअ चा विद्यार्थी होतो आणि मला विद्यार्थ्यांचा त्रास माहिती आहे. मी स्वत:ला एक वचन दिले होते, या मुद्द्यावर मी संसदेत तेव्हाच बोलेन जेव्हा यावर काही तोडगा निघेल आणि सिस्टम सुधारेल. आज तो ऐतिहासिक दिवस आहे जेव्हा सिस्टम सुधारली आहे. पेपरफुटी हा असा आजार आहे. ज्याच्यावर कायमस्वरुपी उपचार हवेत. याचा उपचार मीडियातील बाइटने झाला नसता तर संस्थात्मक तोडगा काढायला हवा होता. जो आज आमच्या सरकारने परीक्षा सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून आणला आहे असे त्यांनी म्हटले. तसेच विद्यार्थ्यांचा राग समजू शकतो. त्यांची परीक्षेबाबत तक्रारही योग्य आहे. तुमची मते महत्त्वाची आहेत. जेव्हा तुम्ही चिंता व्यक्त केली, तुमच्या वेदना मांडल्या तेव्हा पंतप्रधानांनी त्यावर एक पंतप्रधान म्हणून नव्हे तर एका पालकाप्रमाणे ते ऐकले.

विद्यार्थ्यांच्या मागणीवर सरकारची कारवाई
विद्यार्थ्यांच्या मागणीवर सरकारने कारवाई केली. आज ऐतिहासिक निर्णय घेतले गेलेत. त्यातून व्यवस्था बदलत आहे. जेव्हा एक विद्यार्थी परीक्षेची तयारी करतो तेव्हा तो एकटा तयारी करत नसतो. त्याचे संपूर्ण कुटुंब त्याची तयारी करते. १८-१८ तास विद्यार्थी अभ्यास करतात. रात्री २ पर्यंत वाचन करतात. पहाटे ५ वाजता पुन्हा उठतात. सोशल लाईफपासून ते दूर होतात. ज्या परीक्षेची तो तयारी करत असतो तो लीक झाल्यावर विद्यार्थ्यांची मेहनत, विश्वास आणि स्वप्न सर्व लीक होते. त्याला मानसिक त्रासातून जावे लागते असे सांगत खासदार राघव चड्ढा यांनी विद्यार्थ्यांचे दु:ख सभागृहात मांडले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Police Student Dialogue 2.0 | २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांशी पोलीस साधणार थेट संवाद
06:41
Video thumbnail
Latur News | छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भुयारी मार्ग धोकादायक, नागरिकांचा संताप
03:51
Video thumbnail
Latur|सीताराम नगरात रस्ते जलमय; खड्ड्यांमुळे अपघात वाढले,मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
02:45
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54
Video thumbnail
Latur|अखेर पाऊस धावून आला; वाळणाऱ्या पिकांना मिळालं जीवदान!
02:28
Video thumbnail
Nanded|किनवट-माहूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट
00:41
Video thumbnail
Nanded|पुलावरून पाणी, तीन गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल!
00:35
Video thumbnail
Nanded|अखेर सहस्रकुंड धबधबा प्रवाहित! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
00:38
Video thumbnail
Latur|लातूर हादरलं!उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळले दोन तरुण
02:39
Video thumbnail
Nanded|किनवट हादरलं! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १२ तासांनंतरही शोध नाही
01:16

Latest news