केळीचे १००० कंटेनर इराणमध्ये अडकले

मुंबई : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतक-यांना बसताना दिसत आहे. जेएनपीए बंदरातून इराणकडे पाठवलेले जवळपास ८०० ते १ हजार केळीचे कंटेनर तिथेच अडकून पडले असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी युद्धाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणा-या शिपिंग कंपन्यांच्या मनमानीमुळे शेतकरी आणि निर्यातदार देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे.

युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात गल्फ देशांकडे जाणारे १२०० ते १५०० कंटेनर जेएनपीए बंदरात अडकले होते. सुमारे १५ दिवसांनी यातील काही कंटेनर इराणकडे पाठवण्यात आले, तर काही स्थानिक बाजारात विक्रीसाठी वळवण्यात आले. इराणमध्ये कंटेनर पोहोचल्यानंतर शिपिंग कंपन्यांनी युद्धाचा आधार घेत भाड्यात मोठी वाढ केली. आधी २ ते ३ लाख रुपये असलेले भाडे थेट १५ लाख रुपयांपर्यंत नेण्यात आलं. या वाढलेल्या खर्चामुळे निर्यातदार आणि शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

इराणमध्ये माल अडकला
इराणमध्ये पोहोचलेले जवळपास १ हजार कंटेनर शिपिंग कंपन्यांनी अडवून ठेवल्याने केळी खराब होऊ लागली आहेत. एकीकडे वाढलेले भाडे आणि दुसरीकडे खराब होणारा माल, यामुळे शेतक-यांचे दुहेरी नुकसान होत आहे.

शेतक-यांचा आक्रोश
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सोलापूरमधील ५० ते ६० शेतक-यांनी शिपिंग कंपन्यांमध्ये धडक देत जाब विचारला. मात्र काही कंपन्यांनी पोलिसांना बोलावून शेतक-यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

हिंगोलीतील शेतकरी संकटात
युद्धाचा परिणाम हिंगोली जिल्ह्यातील केळी निर्यातीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. व्यापारी खरेदीसाठी पुढे येत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. निर्यात बंद झाल्यामुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या केळीला फक्त ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही.

इतर पिकांनाही फटका
धाराशिव जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतक-यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. निर्यात बंद झाल्यामुळे कलिंगडाला अवघा सव्वा रुपये किलो दर मिळत असल्याचं चित्र आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news