32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeउद्योगपेटीएमनंतर आता ‘भारत पे’ संकटात?

पेटीएमनंतर आता ‘भारत पे’ संकटात?

नवी दिल्ली : भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ‘भारत पे’ला नोटीस पाठवली आहे. ही नोटीस कंपनी कायद्याच्या कलम २०६ अंतर्गत पाठवण्यात आली, ज्यामध्ये सरकारने कंपनीकडून कंपनीचे संस्थापक अश्नीर ग्रोवरवर केलेल्या कायदेशीर कारवाईबद्दल माहिती मागवली आहे.

कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने कंपनीकडून अश्नीर ग्रोवरविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्याबाबात न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांबाबत माहिती मागवली आहे. ‘भारत पे’ कंपनी २०२२ मध्ये अडचणीत सापडली होती.

जेव्हा कंपनीचे संस्थापक अश्नीर ग्रोवर यांनी कोटक ग्रुपच्या कर्मचा-यांविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली आणि त्याला धमकावले. अश्नीर ग्रोव्हरने कोटक ग्रुपच्या एका कर्मचा-याला नायकाचा आयपीओ दिला नाही म्हणून धमकावले होते.

वादानंतर, अश्नीर ग्रोव्हरने ‘भारत पे’ च्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला होता आणि कंपनीने आपल्या आर्थिक खात्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता.

नोटीसवर, भारतपे कंपनीने उत्तर दिले की, मंत्रालयाने कंपनीला नोटीस बजावली आहे आणि अश्नीर प्रकरणात अधिक माहिती मागवली आहे. कंपनीने सांगितले की, आम्ही तपास यंत्रणांना शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करू.

ऑडिटनंतर, ‘भारत पे’ेने अश्नीर ग्रोवर, त्यांची पत्नी आणि त्यांच्या भावाविरुद्ध निधीचा गैरवापर आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. अश्नीर आणि त्यांच्या पत्नीमुळे ८८.६७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा आणि कंपनीने नुकसान भरपाईसाठी गुन्हा दाखल केला होता. मात्र, अश्नीरने स्वत:वर आणि पत्नीवरील आरोप फेटाळून लावले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR