नांदेड : प्रतिनिधी
पोहण्यासाठी नगीना घाट भागातील गोदावरी नदी पात्रात गेलेल्या ३ मुलांपैकी २ मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना २४ मे रोजी सायंकाळी घडली. मृत मुले अण्णाभाऊ साठे चौकातील होती.
शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील तुकोमाई हॉस्पिटल समोरील रहिवासी रणवीर यशवंत शिंगाडे (१४), गणेश डोंगरे(१३) व इतर एक हे २४ मे रोजी सायंकाळी ५. ३० वा. पोहण्यासाठी नगीना घाट भागात गेले होते.
नगीना घाट भागातील गोदावरी नदी पात्रात पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मुले पाण्यात बुडाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
















