हाफिज सईदच्या जावयासह २३ जण दहशतवादी घोषित

नवी दिल्ली : केंद्र सरकारने यूएपीए कायद्यांतर्गत पाकिस्तानातील २३ जणांना दहशतवादी घोषित केले आहे. यात अयोध्येतील रामजन्मभूमी परिसर व नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची टेहळणी करणारा जैश-ए-मोहम्मदचा (जेईएम) सदस्य तसेच लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) संस्थापक हाफिज सईदचा जावई हाफिज खालिद वलीद याचाही समावेश आहे. या २३ जणांपैकी सहाजण भारतीय असून ते सध्या पाक किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये वास्तव्यास आहेत. गृहमंत्रालयानुसार या सर्वांचा भारतात घुसखोरी, दहशतवाद्यांची भरती, निधी उभारणी, शस्त्रास्त्रांचा पुरवठा, ड्रोनद्वारे शस्त्रे पाठविणे व दहशतवादी कारवायांचे नियोजन यात सहभाग आहे.

मसूद इलियास काश्मिरी, मोहम्मद मुसद्दीक ऊर्फ डॉक्टर, मुफ्ती मोहम्मद असगर खान, हाफिज अब्दुल शकूर, हाफिज सईद अब्दुल्ला जिहादी, फिरदौस अहमद भट, गुलाम फरीद, हारुण रशीद गनई, बिलाल अहमद मीर, अबिद कय्यूम लोन, नझीर अहमद गुज्जर, अब्दुल रऊफ, अशफाक अहमद, हाफिज खालिद वलीद, मौलाना इमदाद उल्ला मक्की, मौलाना सैफुल्ला खालिद, मोहम्मद याकूब, मौलाना युसूफ तैयबी, ओवैस फारूज, कारी याकूब शेख, राणा इफ्तिखार, वसीम नूर जाट आणि मोहम्मद शहीद फैजल या २३ जणांना यूएपीए कायद्यांतर्गत केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केले आहे.

१७ पाकिस्तानी, ६ भारतीय
– गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवरील संदेशात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवाद खपवून न घेण्याच्या धोरणानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
– घोषित करण्यात आलेल्या २३ जणांपैकी १७ जण पाकिस्तानी, तर सहा भारतीय नागरिक आहेत. मात्र, सर्वजण सध्या पाकिस्तान किंवा पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमधून भारतविरोधी कारवाया चालवत असल्याचा दावा शाह यांनी केला.

मालमत्ता जप्त करणे होणार सुलभ
२३ जणांना यूएपीएच्या कायद्याच्या अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केल्याने त्यांच्या मालमत्ता जप्त करणे, आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालणे, शस्त्रास्त्र पुरवठा रोखणे आणि त्यांच्या नेटवर्कवर कारवाई करणे राष्ट्रीय तपास संस्थेला अधिक सुलभ होणार आहे. यूएपीएच्या चौथ्या अनुसूचीत समाविष्ट करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या आता ८० झाली आहे. मोहम्मद मुसद्दीक ऊर्फ डॉक्टर याच्यावर राममंदिर, आरएसएस मुख्यालय पानिपत येथील आयओसीएल रिफायनरीची टेहळणी केल्याचा आरोप आहे. तो ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे पाठविणे व घुसखोरी घडवून आणण्यात सक्रिय असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18
Video thumbnail
Nanded|"दोन-चार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा!" – अशोक चव्हाण संतापले
04:36
Video thumbnail
Latur|पदवी आणि UPSC-MPSC तयारी आता एकाचवेळी!;MIT चा अभिनव उपक्रम
02:07
Video thumbnail
Latur|खानापूर रस्त्यावर आशाताई भिसे आक्रमक; अधिकाऱ्यांना उतरावं लागलं मैदानात
04:49
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
17:00
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
00:00

Latest news