४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले

देवास : लग्नाचा थाटमाट, अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात झेंडूच्या फुलांचे हार आणि हातात मिठाईचे डब्बे घेऊन तब्बल ४२ नवरदेव मोठ्या उत्साहाने विवाहस्थळी पोहोचले. लग्नबंधनात अडकण्याची स्वप्ने डोळ्यात घेऊन आलेल्या या तरुणांना काही वेळातच एका अशा धक्कादायक सत्याचा सामना करावा लागला, ज्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे एकही नवरी आलीच नव्हती! ‘अनाथाश्रमातील मुलींशी लग्न लावून देऊ’ असे आमिष दाखवून या सर्व तरुणांची एका मोठ्या टोळीने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील देवासमध्ये समोर आला आहे.

हा केवळ आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नसून ग्रामीण भागातून आलेल्या डझनभर तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा झालेला मोठा मानसिक छळ आहे. इंदूरमधील एका नामांकित अनाथाश्रमाचे नाव वापरून या तरुणांना सामूहिक विवाहाचे आमिष दाखवण्यात आले होते. रविवारी संध्याकाळपर्यंत विवाहस्थळावरील आनंदाचे वातावरण संताप आणि निराशेमध्ये बदलले. आम्हाला इंदूरच्या ‘मातृ छाया आश्रमा’तील मुलींचे फोटो दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात ते फोटो सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेले मॉडेल्सचे होते.

आम्हाला आदल्या दिवशीच देवासला पोहोचायला सांगितले होते आणि हुंडा म्हणून संसारोपयोगी साहित्य देण्याचेही आश्वासन दिले होते. पण आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा तिथे कोणीच नव्हते आणि सर्व आयोजकांचे फोन बंद झाले होते अशी आपबिती हरनियाकलन गावातून आलेल्या राहुल नावाच्या एका तरुणाने सांगितली. या टोळीने फसवणुकीचे नियोजन अत्यंत चलाखीने केले होते. अशोक नावाच्या एका पीडित नवरदेवाने सांगितले की आम्हाला घरून साध्या कपड्यांमध्ये येण्यास सांगण्यात आले होते. लग्नाचे कपडे (शेरवानी) आणि विवाहाचे सर्व विधी तिथेच केले जातील, असे आयोजकांनी सांगितले होते. इतकेच नाही तर घरून हळद किंवा मेहंदी लावून येऊ नका, सर्व विधी विवाहस्थळीच होतील, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली होती.

इंटरनेटवरील फोटो दाखवून केला बनाव
मिळालेल्या माहितीनुसार, या फसवणुकीसाठी प्रत्येक नवरदेवाकडून १५,००० ते २५,००० रुपयांपर्यंत ‘नोंदणी शुल्क’ उकळण्यात आले होते. लग्न ठरवण्यापूर्वी मध्यस्थांनी तरुणांना मोबाईलवर मुलींचे फोटो दाखवले होते. या मुली गरीब असून अनाथाश्रमात वाढल्या आहेत, त्यामुळे त्या लगेच लग्नास तयार असल्याचे तरुणांना सांगण्यात आले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31
Video thumbnail
Pandharpur Accident|पंढरपूर-म्हसवड महामार्गावर भीषण दुर्घटना;पिकअप विहिरीत कोसळून14 भाविकांचा मृत्यू
01:45
Video thumbnail
Nagesh Ashtikar ON Opration Tiger|आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंसोबतच - नागेश आष्टीकर #marathilivenews
02:34
Video thumbnail
Latur News|स्वच्छ भारत अभियान फक्त कागदावर? प्रशासकीय इमारतीची दयनीय अवस्था
02:56
Video thumbnail
Latur News|रविवारीही मनपा खुली; विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रशासन धावले
03:36
Video thumbnail
Latur Accident|लातूर जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच; बुधोडा जवळ भीषण धडक, 3 ठार 17 जखमी
01:14
Video thumbnail
Nilesh Lanke On Election|"राजकारणात काहीही होऊ शकतं!" — निलेश लंकेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
00:44
Video thumbnail
Latur Accident News|अलगरवाडीजवळ मृत्यूचा थरार; तिहेरी अपघातात तिघांचा बळी!
00:29
Video thumbnail
Latur|गॅस महाग, लाकूड महाग;हॉटेल व्यवसायिकांचे कंबरडे मोडले!
02:17

Latest news