‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ६ जवान शहीद

नवी दिल्ली : गेल्या वर्षी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पीओके आणि पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पराक्रम गाजवला होता. पाकिस्तानला धडा शिकवणा-या या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पराक्रमाची शर्थ करणा-या भारताच्या ६ जवानांना वीरमरण आले होते. आता या जवानांची नावे सरकारने पहिल्यांदाज अधिकृतपणे जाहीर केली आहेत. या शूरवीर जवानांच्या नावांचा समावेश समावेश राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ‘रोल ऑफ ऑनर्स’मध्ये करून ती दिल्लीतील स्मारकावर कोरण्यात आली आहेत.

राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या २०२५ या विभागातील वॉल ३डीवर या सहा वीर जवानांची नावे कोरण्यात आली आहेत. वीरमरण आलेल्या जवानांमध्ये लष्कर आणि वायुसेनेच्या जवानांचा समावेश आहे. रायफलमन सुनील कुमार यांना मरणोत्तर वीर चक्र, तर सार्जंट सुरेंद्र कुमार यांना वायू सेना पदक देण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिक ठार झाले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध भडकले होते. चार दिवस चाललेल्या या युद्धादरम्यान भारताचे किती नुकसान झाले हे समोर आले नव्हते. यावेळी राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेतील शहीदांची नावे किंवा इतर माहिती जाहीर केली नव्हती. आता राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या संकेतस्थळावर आणि स्मारकावर या नावांचा समावेश केल्यामुळे या मोहिमेत बलिदान देणा-यांची ओळख देशसमोर आली आहे.

६ वीर जवानांची नावे
– सुभेदार मेजर पवन कुमार – मुख्यालय १० इन्फंट्री ब्रिगेड
– रायफलमन सुनील कुमार (वीर चक्र) – ४ जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री
– लान्स नाईक दिनेश कुमार – ५ फील्ड रेजिमेंट
– एव्हिएशन टेक्निशियन मूड मुरलीनाईक – ८५१ लाइट रेजिमेंट
– हवालदार सुनील कुमार सिंग – २३७ फील्ड वर्कशॉप कंपनी
– सार्जंट सुरेंद्र कुमार (वायू सेना पदक) – ३९ विंग

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|MH-CET पेपरही फुटला? 99 पर्सेंटाइलवरून काँग्रेसचा मोठा आरोप!
02:16
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये चोरट्यांचा धडाका! एका रात्रीत सलग चार दुकाने फोडली
01:52
Video thumbnail
८ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व तपासणी शिबिर
13:50
Video thumbnail
Solapur|उजनी धरण 100 टक्के भरले; भीमा नदीत विसर्ग सुरू
00:23
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप!
08:31
Video thumbnail
Latur|१ ऑगस्टपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा; मातंग समाजाचा इशारा
05:28
Video thumbnail
Latur|किड्स इन्फो पार्कजवळ एसटी आणि स्कूल बसचा अपघात; काही जण किरकोळ जखमी!
00:40
Video thumbnail
Latur|वाहतूक कोंडीला ब्रेक लावण्यासाठी लातुरात मोठा ड्राइव्ह; अतिक्रमणावर कारवाई सुरू!
02:58
Video thumbnail
Nanded|डिजिटल अरेस्टच्या नावाने सायबर ठगांचा नवा डाव; नांदेडमध्ये ५१ लाखांची फसवणूक
03:31
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या मुद्द्यावर नगरसेवकही रस्त्यावर; महामोर्चात सक्रिय सहभाग!
03:13
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणासाठी लातूरमध्ये हजारोंचा एल्गार; महामोर्चाला मोठा प्रतिसाद!
03:32
Video thumbnail
CJP Protest|विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट? शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
12:07
Video thumbnail
Latur|लातुरात गोर बंजारा कवींचा जल्लोष; मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन!
00:43
Video thumbnail
Latur|मराठवाड्याच्या वीर सुपुत्राला मानवंदना; पानगावात कारगिल शहीद बालाजी माले यांचे स्मरण!
01:11
Video thumbnail
Latur|विठुरायाच्या भक्तांसाठी मनसेची सेवा; अन्नछत्रासह मोफत आरोग्य तपासणी!
02:53

Latest news