Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेत डंकी मार्गाने रोज ६५ भारतीय पकडले

अमेरिकेत डंकी मार्गाने रोज ६५ भारतीय पकडले

वर्षभरात २३ हजार लोक अटक

वॉशिंग्टन : अमेरिकेत डंकी मार्गाने प्रवेश करण्याच्या प्रयत्नात गेल्या एका वर्षात दररोज ६५ भारतीय पकडले गेले. जानेवारी ते डिसेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार, अमेरिकन बॉर्डर अँड कस्टमने एकूण २३,८३० भारतीयांना पकडले.

विभागाच्या मते, प्रवेशाची प्रकरणे कमी झाली आहेत, परंतु त्यावर पूर्णपणे आळा बसलेला नाही. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात २०२४ मध्ये एकूण ८५,११९ भारतीय पकडले गेले होते. अधिका-यांनी सांगितले की, यावेळी एक नवीन ट्रेंडही समोर आला आहे. अमेरिकेत प्रवेश करताना पकडले गेलेले सर्व भारतीय सिंगल एंटिटी म्हणजे एकटेच होते. कोणताही भारतीय कुटुंबासोबत पकडला गेला नाही. तर २०२४ मध्ये पकडलेल्या भारतीयांपैकी सुमारे २० हजार भाऊ, पत्नी किंवा मुलांसोबत अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करत होते.

तसेच, अमेरिकेत कॅनडा आणि मेक्सिको सीमेऐवजी आता तुर्कस्तान-दुबई मार्गाने बेकायदेशीर प्रवेशाची प्रकरणे समोर येत आहेत. कॅनडा-मेक्सिको सीमेवर ८ हजारांहून अधिक भारतीय पकडले गेले. कॅनडा सीमेवर २०२५ साली ६९६८ तर मेक्सिको सीमेवर १५४३ भारतीय पकडले गेले. सर्वाधिक १५,३१९ भारतीय इतर अमेरिकन शहरांमधून पकडले गेले.

सूत्रांनुसार तुर्कस्तान-दुबई मार्गावरून विमानाने थेट अमेरिकेत प्रवेश दिला जातो. बहुतेक प्रकरणे अमेरिकेत सुटीच्या व्हिसाच्या नावाखाली प्रवेश करून नंतर मुक्कामाची मुदत ओलांडण्याची आहेत. अमेरिकेतून २०२५ दरम्यान एकूण ३२५४ भारतीयांना परत पाठवण्यात आले. ही संख्या २००९ नंतरची सर्वाधिक आहे. १६ वर्षांत १८८८२ जणांना परत पाठवण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR