बिहारच्या विधानसभेत तुफान राडा

पाटना : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधिमंडळाच्या आवारात गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली धक्काबुक्की देशभरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, आता बिहार विधानसभेमध्येही अशीच धक्कादायक घटना घडली आहे. आज बिहार विधानसभेमध्ये चक्क आमदार आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मार्शलमध्ये धक्काबुक्की झाली. बिहार विधानसभेमध्ये मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार गोंधळ झाला. यादरम्यान, विरोधी पक्षातील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार विरोध करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांसमोरील हौद्यात उतरले. तेव्हा आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की झाली.

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना बिहारमध्ये मतदार यादी पुनरीक्षणाचा वाद पेटला आहे. तसेच त्याचे पडसाद बिहारच्या विधानसभेमध्येही उमटले आहेत. सभागृहामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सतीश कुमार हे मतदार यादी पुनरीक्षणाला विरोध करत टेबलावर चढले. त्यानंतर मार्शल्सनीं त्यांना खाली उतरवले. एकीकडे हा गोंधळ सुरू असताना सत्ताधा-यांकडून सभागृहामध्ये एकापाठोपाठ एक विधेयके सादर केली जात आहेत.

विरोधी पक्षांकडून होत असलेल्या विरोधामुळे सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानसभेच्या प्रवेशद्वारांवर अडथळा निर्माण झाला होता. तसेच उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना अन्य पर्यायी मार्गाने सभागृहात यावे लागले. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मागच्या द्वाराने विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू होताच गोंधळामध्येच प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज पुकारले गेले. विधानसभा अध्यक्षांनी गोंधळ घातल असलेल्या सभासदांना इशारा दिला. मात्र हे सदस्य ऐकले नाहीत. त्यापैकी काहींची सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मार्शल्ससोबतही धक्काबुक्की झाली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NEET Paper Leak: लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; पाचवा नामांकित डॉक्टर रडारवर, चौकशी सुरू!
03:29
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून सुटका
01:42
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशीपला तुफान प्रतिसाद
08:56
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्ह्यात काही भागात वादळी पाऊस;विळेगाव थडी येथे मंडप उडाला
00:32
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये इंधन टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा;डिझेल साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई
02:49
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|पुरावे नष्ट करण्यासाठी पेपर रद्दीत ? CBI ची मोठी चौकशी
02:26
Video thumbnail
Nanded|खड्ड्यामुळे दुचाकीचा भीषण अपघात ; संतप्त नागरिकांचा रस्ता रोको
03:02
Video thumbnail
Congress Protest|उद्योग भवन परिसरातील व्यावसायिक आक्रमक;जिल्हा उद्योग केंद्राच्या नोटीसची होळी
04:52
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
00:00
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
05:51
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20

Latest news