परवाने रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात रिक्षा-टॅक्सी संघटनेचा एल्गार

मुंबई : प्रतिनिधी
‘व्यावहारिक मराठी’ सर्व व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणा-या चालकांना अनिवार्य करण्यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीत ऑटो-टॅक्सी संघटनेने राज्य सरकारच्या प्रस्तावित निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. २ मे २०२६ पासून मराठी लिहिता-वाचता न येणा-या ऑटो-टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक आणि गैरकायदेशीर असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील भूमिका ठरवण्यासाठी ऑटो-टॅक्सी चालकांची महत्त्वाची सभा बोलावण्यात आली आहे. ही सभा सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉलमध्ये होणार असून मोठ्या संख्येने चालक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. संघटनेचे पदाधिकारी शशांक राव यांनी सर्व चालकांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ‘व्यावहारिक मराठी’ सर्व व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणा-या चालकांना अनिवार्य करण्यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव व संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे.

ही बैठक दिनांक २७ एप्रिल रोजी परिवहन मंत्री यांच्या दालनात दुपारी १२.३० वाजता होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे, या मुद्यासह मराठी भाषा त्यांना शिकवण्यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे यावर चर्चा होणार आहे.
महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात प्रवाशांशी सुसंवाद वाढवण्यासाठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणा-या चालकांना किमान ‘व्यावहारिक मराठी’ भाषा येणे अनिवार्य करण्याची भूमिका प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे. ही भूमिका केवळ भाषिक आग्रह नसून, प्रशासन, सेवा गुणवत्ता आणि सामाजिक समन्वय यांचा व्यापक विचार करून घेतलेला निर्णय म्हणून पाहता येतो. अशी भूमिका शासनाच्या वतीने घेण्यात आली आहे.

भूमिकेची पार्श्वभूमी
मराठी ही राज्याची अधिकृत राजभाषा आहे. दररोज लाखो प्रवासी रिक्षा, टॅक्सी, बस, अ‍ॅप-आधारित सेवा (ओला-उबर) यांचा वापर करतात. अशा वेळी चालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद सहज, स्पष्ट आणि प्रभावी असणे अत्यंत आवश्यक ठरते. अनेकदा अमराठी चालकांमुळे संवादात अडथळे निर्माण होतात, तक्रारी वाढतात आणि गैरसमज होतात.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|RCC क्लासेसवर पुन्हा CBI ची धाड;तपासाचा फास आणखी आवळला
01:54
Video thumbnail
मानवत तालुक्यात डिझेल भरण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कॅनने एकमेकांना झोडपले, व्हिडिओ व्हायरल!
00:49
Video thumbnail
जळकोट तालुक्यात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा; सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
01:15
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05

Latest news