Homeराष्ट्रीयजागतिक दबावाला झुगारून रशिया भारताच्या पाठीशी; ऊर्जा पुरवठा अखंड ठेवण्याची ग्वाही

जागतिक दबावाला झुगारून रशिया भारताच्या पाठीशी; ऊर्जा पुरवठा अखंड ठेवण्याची ग्वाही

नवी दिल्ली: जागतिक राजकारणात वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, रशियाने भारतासोबतचे आपले व्यापारी आणि धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्याचे संकेत दिले आहेत. “जगातील कोणताही दबाव असला तरी, रशिया भारताचा तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा खंडित होऊ देणार नाही,” असे महत्त्वपूर्ण विधान रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेय लावरोव्ह यांनी केले आहे.

यावेळी लावरोव्ह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची मुक्तकंठाने स्तुती केली. ते म्हणाले की “पंतप्रधान मोदी हे जगातील आजवरच्या सर्वात उत्साही आणि कार्यक्षम नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत आपली राष्ट्रीय हितसंबंध अत्यंत प्रभावीपणे जपत आहे.” भारताच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा लक्षात घेता, रशियाने विश्वास दिला आहे की पुरवठ्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही.

रशियन पुरवठ्याबाबत भारताच्या हितसंबंधांना कोणतीही झळ पोहोचणार नाही, याची मी वैयक्तिकरित्या खात्री देतो. भारताची ऊर्जा सुरक्षा रशियासाठी महत्त्वाची असून, ती संरक्षित राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पाश्चात्य देशांकडून होणारी ‘अयोग्य आणि अप्रामाणिक स्पर्धा’ (Unfair competition) आमच्या करारांना बाधा पोहोचवू शकणार नाही, यासाठी रशिया सर्वतोपरी प्रयत्न करेल.

युक्रेन युद्ध आणि त्यानंतर रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेक पाश्चात्य देशांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव आणला होता. मात्र, भारताने नेहमीच आपल्या ‘राष्ट्र प्रथम’ धोरणाचा अवलंब केला आहे. लावरोव्ह यांच्या या विधानामुळे भारत-रशिया मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याचे मानले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR