भारताच्या पुढाकाराने रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकते

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारताने रशियावर अधिक दबाव आणला, तर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आपली भूमिका बदलून युरोपमध्ये शांतता प्रस्थापित करू शकतील, अशी आशा एस्टोनिया या देशाच्या मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

सन २०२२ पासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे. अद्यापही हे युद्ध थांबलेले नाही. रशिया आणि युक्रेन यापैकी कोणताही देश माघार घ्यायला तयार नाही. दोन्ही देशांमधील तणाव कमी होताना दिसत नाही. परंतु, आता शांततेच्या आशा आता वाढत असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, या युद्धामुळे एस्टोनियासारख्या लहान युरोपीय देशांनाही रशियाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. यातच एस्टोनियाचे परराष्ट्र मंत्री मार्गुस त्साहकना भारत दौ-यावर आलेले आहेत. यावेळी त्यांनी भारताच्या भूमिकेचे स्वागत केले.

एएनआयला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत एस्टोनियाच्या परराष्ट्र मंर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले, आम्हाला युरोपमध्ये शांतता हवी आहे, परंतु रशिया अद्याप आपली ध्येय बदलण्यास तयार नाही. भारत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. भारताने रशियावर आणखी दबाव आणला, तर आम्हाला आशा आहे की पुतिन आपला मार्ग बदलतील. युद्ध थांबवण्यासाठी रशिया अद्याप पूर्णपणे तयार नाही, परंतु भारतासारख्या देशांचा प्रभाव कामी येऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी केलेले हे विधान भारताचा वाढता जागतिक राजनैतिक प्रभाव दर्शवते, असे म्हटले जात आहे.

युद्ध आता अंतिम टप्प्यात : पुतिन
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतेच विजय दिनाच्या संचलनानंतर सांगितले की, युक्रेनसोबतचे युद्ध आता अंतिम टप्प्यात आले आहे. काही परकीय देशांमधील जागतिकवादी घटकांनी रशियाविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी युक्रेनचा शस्त्र म्हणून वापर केला आहे. युक्रेनने सुरुवातीला सहमती दर्शवली होती, परंतु ब्रिटन आणि फ्रान्सच्या दबावामुळे ते मागे हटले. ते युक्रेनच्या माध्यमातून आमच्यावर युद्ध लादत आहेत. युरोपमधील राजकीय बदलामुळे हा संघर्ष संपुष्टात येईल.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर पॅटर्नचे यश, आव्हाने आणि भविष्य; पहा काय म्हणाले डॉ.सोमनाथ रोडे!
24:00
Video thumbnail
हिंगोलीत डिझेल टंचाईचे संकट! शेतीच्या कामासाठी पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या किलोमीटर लांब रांगा
03:11
Video thumbnail
NEET पेपर फुटी प्रकरण: डॉ. मनोज शिरुरेंच्या पत्नीची CBI कडून कसून चौकशी; धक्कादायक माहिती समोर
03:11
Video thumbnail
उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
09:33
Video thumbnail
लातुरात डॉ. मनोज शिरुरेंच्या नातेवाईकांवर CBI चा छापा; दोन तास चौकशी, मोठी रोकड जप्त!
03:00
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56

Latest news