लातूरचे डॉ. मनोज शिरुरे अटकेत

लातूर/पुणे : प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून, लातूरमध्ये तळ ठोकून असलेल्या सीबीआयच्या पथकाकडून सातत्याने कारवाईचा धडाका सुरू आहे. लातूरमधील सिद्धिविनायक बालरुग्णालयाचे प्रमुख बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांच्या रुग्णालयावर दोन दिवसांपूर्वी छापे टाकून चौकशी केल्यानंतर सीबीआयने चौकशीसाठी पुण्यात बोलावले होते. बुधवारी रात्री त्यांना ताब्यात घेऊन प्रथम चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना रात्री उशिरा सीबीआयने अटक केली. या आधी पेपर फोडणारा आणि पेपर विक्री करणा-या सूत्रधारांना अटक केली.

यामध्ये पेपर विकत घेणारे पालक आणि विद्यार्थीही चौकशीच्या फे-यात अडकले होते. त्यामुळे डॉ. शिरुरे यांच्या रुपाने प्रथमच एक पेपर विकत घेणारे पालक जाळ््यात अडकले आहेत. दरम्यान, लातूरमध्ये गुरुवारी डॉ. शिरुरे यांच्या नातेवाईकाच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आणि तेथे नातेवाईकांची चौकशी करून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. यामुळे लातुरात खळबळ उडाली आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने कसून तपास सुरू ठेवला असून, लातूरमध्ये या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे सापडत असल्याने सीबीआयचे पथक लातूरमध्ये तळ ठोकून आहे. या पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील ३ डॉक्टरही सामिल असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. सीबीआयने तपासाची चक्रे फिरवित सिद्धिविनायक बालरुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांच्या रुग्णालयावर दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने छापा टाकून झाडाझडती घेत असताना डॉक्टरांचीही चौकशी केली होती. चौकशीदरम्यान, त्यांचा मोबाईल आमि काही महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले होते. तसेच हाती लागलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांना पुण्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. पुण्यात त्यांची चौकशी करून काल रात्री उशिरा अटक झाल्याने वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.

डॉ. मनोज शिरुरे यांनी पालक म्हणून आपल्या पाल्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक झालेले निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी, आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्याशीही डॉ. शिरुरे यांचे निकटचे संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. सीबीआयकडून या संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू असून, लातूरमधील काही विद्यार्थी, पालक आणि कोचिंग संस्थांच्या संबंधितांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. डॉ. शिरुरे यांचा मागील काही वर्षांपासून पेपरफुटीच्या नेटवर्कमध्ये सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणी प्रथमच पालक अटकेत
नीट पेपरफुटी प्रकरणी प्रथमच डॉ. शिरुरे यांच्या रूपाने एका विद्यार्थ्याच्या पालकाला अटक झाली. आतापर्यंत ज्यांनी नीटचा पेपर फोडला, नीटचा पेपर विकला, यांच्यावर कारवाई करण्यात आली. परंतु आता नीटचा पेपर स्वत:च्या मुलासाठी खरेदी करणा-या पहिल्या पालकाला सीबीआयने अटक केली. त्यामुळे चौकशीच्या फे-यात अडकलेल्या पालकांचे धाबे दणाणले आहेत.

अंबाजोगाईत आईसह दोन मुलांची चौकशी
नीट पेपरफुटीत बीड कनेक्शन
नीट पेपरफुटी प्रकरणात आता बीड कनेक्शन समोर आले असून, अंबाजोगाईतील २ विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षिका आईची सीबीआयकडून तब्बल सव्वादोन तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशी करण्यात आलेले हे दोन्ही बहीण-भाऊ लातूरमध्ये शिक्षण घेत होते. यापैकी बहीण रिपीटर विद्यार्थिनी असून ती पुन्हा नीट परीक्षा देत होती तर भाऊ पहिल्यांदाच परीक्षेला बसला होता. हा पेपर या दोघांसाठीच घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. चौकशीदरम्यान विद्यार्थ्यांच्या शिक्षिका असलेल्या आईलाही प्रश्न विचारण्यात आल्याने तपासाची व्याप्ती वाढल्याचे दिसून आले.

आरसीसीने सुरू केली विद्यार्थ्यांची सराव परीक्षा
नीट पेपरफुटी प्रकरणाची तपासचक्रे लातूरमधील आरसीसी प्रमुख प्रा. शिवराज मोटेगावकर आणि आरसीसीभोवती फिरत आहेत. यामुळे आरसीसीचे नीट परीक्षेशी संबंधित क्लासेस बंद झाले होते. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेत लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासेसने विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा सुरू केली. नीट परीक्षा पुन्हा घेण्यात येत आहे. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम लक्षात घेऊन आरसीसीच्या नियोजन समितीने सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने कॅम्पसमध्ये दाखल झाले आहेत. परीक्षा पद्धतीनुसार त्यांची तयारी करून घेतली जात आहे.

डॉ. शिरुरेच्या पत्नीसह
नातेवाईकाची चौकशी
डॉ. शिरुरेला बुधवारी रात्री उशिरा अटक केल्यानंतर गुरुवारी सीबीआयच्या पथकाने लातूरमधील डॉ. शिरुरेच्या नातेवाईकाच्या घरी छापा टाकला आणि घराची झाडाझडती घेतानाच अडीच ते तीन तास नातेवाईकांची चौकशी केली. तसेच कागदपत्रे खंगाळतानाच चौकशीदरम्यान रोकड जप्त केली. दरम्यान, रात्री डॉ. शिरुरे यांच्या पत्नीचीही सीबीआय पथकाने चौकशी केली. त्यांचाही पेपरविक्री किंवा पेपर लिकेजमध्ये हात आहे का, याचा तपास सीबीआयने केला. त्यांना कदाचित पुण्यात चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

आणखी २ डॉक्टर रडारवर
मुलीसाठी पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून डॉ. शिरुरेला अटक झाल्यानंतर लातूरमधील आणखी २ डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत. कारण हे दोन डॉक्टर सीबीआयच्या रडारवर आहेत. यासंबंधीचे धागेदोरे तपासले जात असून, तेदेखील चौकशीच्या फे-यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24
Video thumbnail
Nanded|तुकाराम मुंढे नांदेडला? शहरातील गुटखा विक्रेत्यांची धावपळ
00:32
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अण्णाभाऊ साठे कुटुंब मैदानात;आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची तयारी
04:08
Video thumbnail
Latur|फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी
04:04
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31

Latest news